सध्या दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान (South Africa And Afghanistan) यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला एकदिवसीय सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने आफ्रिकेचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्तानने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन दाखवले आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
तत्पूर्वी एडन मारक्रमच्या (Aiden Markram) नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि 33.3 षटकात 106 धावांवर आफ्रिकेला सर्वबाद केले. संघाकडून विआन मुल्डरने अर्धशतक झळकावले. त्याने सर्वाधिक 52 धावा केल्या. दरम्यान त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.
107 धावांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने 26 षटकात 4 गडी गमावून दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानसाठी गुलबदीन नईबने 27 चेंडूत सर्वाधिक 34 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 षटकार आणि 3 चोकार लगावले. अझमतुल्ला ओमरझाई 25, कर्णधार हाशमतुल्ला शाहिदी 16 आणि रियाझ हसनने 16 धावा केल्या. यांच्या जोरावर अफगाणिस्तानने लक्ष गाठले.
अफगाणिस्तानसाठी फारुकीने 7 षटकात केवळ 35 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याने एक निर्धाव षटकही टाकले. अल्लाह गझनफरने 3 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) 30 धावा देत विकेट्स घेतल्या. दोन्ही संघातील दुसरा एकदिवसीय सामना (20 सप्टेंबर) रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: “आम्ही विरोधकांचा विचार…” पहिल्या सामन्यापूर्वी बांगलादेश कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य
IND vs BAN: विराट-शाकिबमध्ये होणार जंगी लढत, जाणून घ्या सामन्यापूर्वी टॉप-5 खेळाडूंची लढाई
IND vs BAN: पहिल्या सामन्यात संधी कोणाला पंत की जुरेल? प्रशिक्षकाने थेटच सांगितले