---Advertisement---

“आम्ही या स्पर्धेचा…” सेमीफायनलमधील पराभवानंतर राशिद खानची प्रतिक्रिया समोर

On: गुरूवार, जून 27, 2024 10:18 AM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात राशीद खानच्या नेतृत्तवाखील अफगाणिस्तान संघाने शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने मोठ्या संघांना धक्का देत सेमीफायनलचे तिकीट पक्कं केले होते. मात्र सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तान संघ कमकुवत पहायला मिळाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात राशीद खानच्या अफगाणिस्तान संघाला दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले आहे.

टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आफ्रिकेने पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान संघाने दिलेल्या 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने एकतर्फी विजयाची नोंद केली. आफ्रिकेने 67 चेंडूत 9 विकेट्स राखुन सामना आपल्या नावे केला. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आाहे.

सामन्यानंतर बोलताना राशिद खान म्हणाला “आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला. आम्ही उपांत्य फेरीत खेळणे आणि आफ्रिकेसारख्या आघाडीच्या संघाकडून हरणे स्वीकारू. आमच्यासाठी ही फक्त सुरुवात आहे, आमच्याकडे कोणत्याही बाजूने मात करण्याचा आत्मविश्वास आणि विश्वास आहे. आम्हाला फक्त आमच्या प्रक्रिया ठेवण्याची गरज आहे.”  

तो पुढे म्हणाला “आम्ही स्पर्धेमधून जे घेतो तो विश्वास असतो. आम्हाला माहित आहे की आमच्याकडे कौशल्ये आहेत, ती फक्त कठीण परिस्थिती, दबाव परिस्थिती हाताळण्यासाठी आहे” 

सामन्यात सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेचा दबदबा पहायला मिळाला. टाॅस जिंकून राशिद खानेने पहिल्यांंदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्याचा अफगाणिस्तानच्या कोणत्याही फलंदाजकडे त्याचे उत्तर नव्हते. संघ पूर्ण 20 षटके खेळू शकला नाही. 11.5 षटकात 56 धावांवर सर्वबाद झाला. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकाने 8.5 षटकात 1 विकेट गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघ यंदाच्या टी20 विश्वचषकासाठी अंतिम फेरी गाठणार पहिला संघ ठरला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेनं रचला इतिहास, अफगाणिस्तानंला पछाडून फायनलमध्ये थाटात एंट्री!
दक्षिण आफ्रिका समोर अफगाणिस्तानंच लोटागंण, सेमीफायनलमध्ये 56 धावांत सर्वबाद
आश्चर्यकारक! यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित-बटलरची आकडेवारी समान

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---