आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यासाठी फक्त काही आठवडे उरले आहेत. पाकिस्तानने आयोजित केलेली ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून कराची येथे सुरू होणार असून ती 9 मार्चपर्यंत चालणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणारे आठ संघ आपापली रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानने एक मोठे पाऊल उचलले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्ये होणार आहे
युनूस खान आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानचा मार्गदर्शक म्हणून काम करेल, ज्याची पुष्टी एसीबीने केली आहे. निवृत्तीनंतर युनूसने अनेकवेळा प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तो काही काळ पाकिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षकही होता. युनूसने पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये पेशावर झल्मीसोबत काम केले. तो अलीकडेच अबू धाबी टी 10 लीगमध्ये बांगला टायगर्सचा मुख्य प्रशिक्षक होता. अफगाणिस्तानने युनूसची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करून ‘भारतीय फॉर्म्युला’ पाकिस्तानमध्येही आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, 2023 मध्ये जेव्हा भारतात एकदिवसीय विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अफगाणिस्तानने माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली होती.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
Former Pakistan skipper Younis Khan has been appointed as the mentor for the Afghanistan team for the 2025 Champions Trophy 🇦🇫🏏#YounisKhan #Afghanistan #ChampionsTrophy #Sportskeeda pic.twitter.com/e9apYEodFv
— Sportskeeda (@Sportskeeda) January 8, 2025
एकदिवसीय विश्वचषकात जडेजाच्या मार्गदर्शनाचा अफगाणिस्तानला खूप फायदा झाला कारण त्याला भारतीय परिस्थितीची चांगली जाणीव होती. अफगाणिस्तानने साखळी फेरीत इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभूत करून वाहवा मिळवली. अफगाणिस्तानने 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्येही अशीच रणनीती आजमावली होती. अफगाणिस्तानने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला टी20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. ज्याचे चांगले परिणाम दिसून आले. अफगाणिस्तानने स्पर्धेतील आपले सर्व सामने वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळले आणि उपांत्य फेरी गाठली.
हेही वाचा-
अरे देवा! कुठून सुरुवात करू?…या दोन भारतीय खेळाडूंबद्दल हे काय म्हणाले ॲलन डोनाल्ड?
भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! निवड समितीला कठोर निर्णय घेण्याचा सल्ला
“भांडतो विराट कोहली, पण संपूर्ण टीमला भोगावं लागतंय…”, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया