प्रत्येक संघासाठी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणे आनंदाचे आणि फायद्याचे ठरते. मात्र, घरच्या मैदानावर खेळणे एका संघाच्या नशिबात नाही. म्हणजे जर एखाद्या संघाकडे घरचे मैदानच नसेल तर त्यांची काय अवस्था होईल, हे सांगणे अशक्य आहे. अशी स्थिती अफगाणिस्तान क्रिकेट संघावर आली. त्यांना आंतरराष्ट्रीय सामने खेळता यावे म्हणून बोर्डने मैदानाची शोधाशोध केली आणि आता त्यांची चिंता मिटली. कारण त्यांना संयुक्त अमिराती क्रिकेट बोर्डने मदत केली आहे.
अफगाणिस्तानने मागील अनेक सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केले होते. एकंदरीत ते त्यांच्यासाठी घरचेच मैदान ठरले होते. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) क्रिकेट बोर्ड यांच्यात मोठा करार झाला आहे. अफगाणिस्तानसाठी पुढील पाच वर्ष युएई हे होम ग्राऊंड असणार आहे. या कराराबाबतची घोषणा यूएई क्रिकेट बोर्डने त्यांंच्या अधिकृत ट्वीटर पेजवर केली आहे.
या करारामध्ये अफगाणिस्तानला प्रत्येक वर्षी एक टी20 मालिका यूएईविरुद्ध खेळावी लागणार आहे, अशी अट यूएईच्या क्रिकेट बोर्डने ठेवली असून ती अफगाणिस्तानने मान्य देखील केली आहे. याबरोबरच यूएई क्रिकेट बोर्ड अफगाणिस्तानला व्हिसा आणि कार्यकालीन ऑफिससाठी आवश्यक ती मदत करणार आहे.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
Very excited to share #UAECricket & @ACBofficials have formalised a five-year agreement which will welcome #AfghanistanCricket to UAE’s world-class venues (for home fixtures) plus annual #UAEvAFG T20I matches 🙌
Read more 👉 https://t.co/57GwQhZTzH pic.twitter.com/psH3WEx6o1
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) November 27, 2022
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसीब खान यांनी या करारामधून दोन्ही बोर्डांना लाभ होणार याचा विश्वास दिला आहे. माध्यमांमधील काही रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या जवळपास 12 खेळाडूंंच्या रेजीडेंसी व्हिसाही तयार आहेत.
यूएई क्रिकेट बोर्डचे महासचिव मुबश्शिर उस्मानी यांनी म्हटले,” अमिराती आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात चांगले संबंध आहेत. आम्ही त्यांची मदत करून खूष आहोत. त्यांनी आमच्या संघासोबत प्रत्येक वर्षी टी20 मालिका खेळण्यास मान्यता दिली. त्यामुळे आमच्या संघाचीही मदत होणार आहे.”
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याने बाकी आंतरराष्ट्रीय संघ त्यांच्या देशात जाऊन खेळण्यास इच्छित नाही. तसेच त्यांच्या क्रिकेट बोर्डच्या अनेक अधिकाऱ्यांनी देशच सोडला आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळणेही अवघड झाले आहे. आता मात्र त्यांचा युएईसोबत करार झाल्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या अडचणी काही प्रमाणात दूर झाल्या आहेत. Afghanistan Cricket Board Signs five-year agreement with UAE Cricket Board for Home Games
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 17 वर्षांनी रंगणार इंग्लंड-पाकिस्तान कसोटीचा थरार; स्टोक्स सेना पाकिस्तानमध्ये दाखल
‘मिस्टर 360 नाही 720 डीग्री…’, सूर्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहून चाहते भलतेच खुश