---Advertisement---

U19 विश्वचषक चार दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अफगाणिस्तान संघ अजून पोहोचलाच नाही; गंभीर आहे कारण

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 10:59 PM
afghanistan u19
---Advertisement---

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup 2021) १४ जानेवारीपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषक सामने सुरू होण्यापूर्वी संघांमध्ये सराव सामने खेळले जात आहेत. स्पर्धेत सहभागी होणारे जवळपास सर्व संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, अफगाणिस्तान संघ (afghanistan u19 team) मात्र अद्याप वेस्ट इंडीजमध्ये पोहोचला नाही. अफगाणिस्तान संघ वेस्ट इंडीजमध्ये पोहोचला नसल्याने आयसीसीला त्यांचे सराव सामने रद्द करावे लागले आहेत. अफगाणिस्तानी खेळाडूंना अजूनपर्यंत विजा मिळाला नसल्यामुळे ते वेस्ट इंडीजमध्ये पोहचू शकले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषकातील अफगाणिस्तानचा पहिला सामना १६ जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्ध असेल. तत्पूर्वी, त्यांना १० जानेवारीला इंग्लंड आणि १२ जानेवारीला यूएईसोबत सराव सामने खेळायचे होते. मात्र, आता हे सामने रद्द केले गेले आहेत.

अफगाणिस्तानचा १९ वर्षाखालील संघ अद्याप वेस्ट इंडीजमध्ये न पोहचण्यामागचे कारण सांगताना आयसीसीने सांगितले आहे की, “अफगाणिस्तान संघाला विजा घेण्यासाठी उशीर झाल्यामुळे संघ अजूनपर्यंत वेस्ट इंडीजमध्ये नाही पोहचला. या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.” आयसीसीने या मुद्यावर स्पष्टीकरण दिले असले तरी, खेळाडूंना विजा मिळवण्यासाठी एवढा उशीर का लागत आहे? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

आयसीसीचे स्पर्धा प्रमुख क्रिस टेटली यांनी याबाबतीत बोलताना सांगितले की, “अफगाणिस्तान संघ विजा मिळण्यासाठी उशीर झाल्यामुळे अजूनपर्यंत वेस्ट इंडीजमध्ये पोहचला नाहीय. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. आम्ही सराव सामन्यांचे वेळापत्रक पुन्हा तयार केले आहे, ज्यामुळे संघांना त्यांची तयार करता येईल.” आता इंग्लंड आणि यूएई यांच्यात ११ जानेवारीला सराव सामना होईल

अफगाणिस्तानचे १९ वर्षाखालील विश्वचषकातील वेळापत्रक –

अफगाणिस्तानला स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना १६ जानेवारीला झिम्बाम्वेविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना १८ जानेवारीला पापुआ न्यू गिनीसोबत असेल. स्पर्धेतील अफगाणिस्तानचा तिसरा सामना २० जानेवारीला होईल. ज्यामधे त्यांच्यासमोर पाकिस्तान संघाचे आव्हान असेल. अफगाणिस्तान आणि हे इतर संघ विश्वचषकाच्या ग्रुप सी मध्ये सहभागी आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२२: हार्दिकच्या खांद्यावर अहमदाबादच्या नेतृत्वाची जबाबदारी? हे दोन टी२० स्पेशालिस्ट देणार साथ?

केपटाऊन टेस्ट : मोहम्मद सिराजच्या फिटनेसबाबत कर्णधार विराट कोहलीची महत्वाची माहिती; म्हणाला…

अखेर पंतच्या बेजबाबदार खेळण्यावर कर्णधार कोहली बोललाच! वाचा काय म्हटलंय त्याने

व्हिडिओ पाहा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---