आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या गट सामन्यात संघाने श्रीलंका आणि नंतर बांगलादेशचा पराभव केला. सुपर-4 मधील संघाकडून सर्वांना मोठ्या आशा होत्या पण त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानचा भारताविरुद्धच्या सामन्यात 101 धावांनी पराभव झाला. यानंतरही स्टेडियममध्ये त्यांच्या समर्थकांची कमतरता नव्हती. वाजमा अयुबी नावाच्या अफगाण रहस्यमय मुलीचा फोटो स्पर्धेच्या सुरुवातीला व्हायरल झाला होता. त्याच वाजमाने तिच्या आवडत्या संघाबाबत एक खुलासा केला आहे.
One last tribute with our beautiful flag to our #bluetigers and #AsiaCup2022, though I was unwell, but I didn’t miss watching the last match of my two favorite teams. #AFGvsInd 🇦🇫♥️🇮🇳#AFGvsPAK #AFGvsBAN #AFGvsSri pic.twitter.com/5klQdq8gsq
— Wazhma Ayoubi 🇦🇫 (@WazhmaAyoubi) September 9, 2022
भारत आवडता संघ
आशिया कपमध्ये अफगाणिस्तानचा शेवटचा सामना भारताविरुद्ध होता. या सामन्यापूर्वी वाजमा अयुबीची तब्येत खराब होती, तरीही ती सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली. तसेच भारताला आपला आवडता संघ असे वर्णन केले. तिने सोशल मीडियावर लिहिले की, “आमच्या ब्लू टायगर्स आणि आशिया कप 2 022 ला आमच्या सुंदर ध्वजासह शेवटचे समर्थन (आशिया चषकातील), मी आजारी होते पण माझ्या दोन आवडत्या संघांचा शेवटचा सामना पाहणे मी चुकवू शकत नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव
पुन्हा दिसला पाकिस्तानी खेळाडूंचा बालिशपणा! श्रीलंकेविरुद्धचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल