आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहली त्याच्या जुन्या अंदाजात खेलताना दिसू लागला आहे. चाहत्यांमध्ये विराट चांगल्या फॉर्ममध्ये परतल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. मागच्या जवळपास तीन वर्षांपासून विराटने एकही शतक केले नव्हते. परंतु अखेर गुरुवारी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी त्याच्या शतकाचा दुष्काळ संपला. मागच्या काही दिवसांमध्ये विराट कसल्याही प्रकारचा दबाव घेताना दिसत नाहीये. हीच गोष्ट त्याच्या सोशल मीडियावर देखील दिसून आली. त्याने एक मस्त इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, जी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरल्याचे दिसते.
विराट कोहली (Virat Kohli) याने शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 122 धावा केल्या. हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक ठरले आहे. त्याआधी विराटचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये आले होते, त्यामुळे या शतकाचे महत्वाच खूपच जास्त झाले. फॉर्म पुन्हा मिळाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर त्याचे जुने हसू पुन्हा एकदा पाहायाला मिळाले. अशातच त्याने इंस्टाग्रामवर खात्यावरून एक स्टोरी शेअर केली, ज्यात त्याचे लहानपणीचे रूप पाहायला मिळाले.
विराट या फोटोत कुठल्यातरी कार्यक्रमात जेवण करताना दिसत आहे. या सुंदर फोटोवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटने लिहिले की, “खाओ पिओ ऐश करो मित्रो, पण दिल किसी का दुखाओ ना.” दरम्यान, विराटच्या या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान, विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 122 धावांची वादळी खेळी केली आणि भारतीय संघाल 212 धावांच्या विशाल स्कोर उभा केला. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे केएल राहुल संघाचे नेतृत्व करत होता. राहुलने देखील या सामन्याच्या कर्णधारपदाला साजेशी 62 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ 111 धावांनी गुंडाळला गेला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जरी भारताने 101 धावांनी मोठा विजय मिळवला असला, तरी संघ अंतिम सामन्यात मात्र पोहोचू शकला नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव
पुन्हा दिसला पाकिस्तानी खेळाडूंचा बालिशपणा! श्रीलंकेविरुद्धचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील






