डेहराडून। 7 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामन्यात पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानने 1 धावेने रोमांचकारी विजय मिळवला.
या सामन्यातील विजयाबरोबरच अफगाणिस्तानने 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकत बांग्लादेशला व्हाईटवॉश दिला. हा विजय साजरा करताना अफगाणिस्तानने सामना संपल्यावर मैदानातच नागिन डान्स करायला सुरवात केली.
याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे. याच सामन्यात आधी अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद शेहजादला बांग्लादेशचा गोलंदाज नझमुल इस्लामने बाद केल्यावर नागिन डान्स करत आनंद व्यक्त केले होता.
https://twitter.com/rashidrealfan/status/1004961552858927104
यामुळे जेव्हा अफगाणिस्तानने सामना जिंकला तेव्हा त्यांनीही नागिन डांन्स करत विजय साजरा केला.
https://twitter.com/maghizhann/status/1004914592802320384
याआधीही क्रिकेटमध्ये नागिन डान्स करण्याचा प्रकार घडला आहे. याचवर्षी श्रीलंका, बांग्लादेश आणि भारत संघात झालेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत बांग्लादेशने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर नागिन डान्स केला होता. यानंतरच नागिन डान्स प्रसिद्ध झाला आहे.
अफगाणिस्तान आता त्यांचा पहिलाच कसोटी सामना भारताविरुद्ध 14 ते 18 जून दरम्यान बेंगलोरला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- प्रो कबड्डीतील टॉप ५ बचावपटूंच्या कामगिरीवर एक नजर…
–वजन वाढलं म्हणुन चिकन न खाणाऱ्या सेहवागचं म्हणणं ऐकल्यावर सचिनने काय केलं पहाचं!
–फ्रेंच ओपनला आज मिळणार महिला एकेरीची नवी विजेती
–कोहलीच्या दाढीच्या इन्शुरन्सबद्दलच्या चर्चा भंपक!
–संघ बदलुनही अनुप कुमारच्या नावावर होणार असा विक्रम जो कुणालाही मोडणं केवळ अशक्य!