पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पाहुण्या पाकिस्तान संघाने 59 धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत जयमान आफगाणिस्तान संघाला क्लीन स्वीप दिला. पाकिस्तानसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके केली. तसेच गोलंदाजी विभागात शादाब खान यांने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
मोहम्मद रिझवान सामनावीर ठरला. रिझवानने 79 चेंडूत सर्वाधिक 67 धावांची खेळी केली होती. त्याला साथ मिळाली बाबर आझम याची. कर्बाणधार बरने 86 चेंडूत 60 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 268 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ 48.4 षटकात 209 धावा करून सर्वबाद झाला. अफगाणिस्तानसाठी मुजीब उर रहमान याने 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
पाकिस्तानसाठी शादाब खान याने 10 षटकात 42 धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याचसोबत मोहम्मद रिझवान, फाहीम अशरफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. आघा अस्लम याला एक विकेट मिळाली. तत्पूर्वी अफगाणिस्तानसाठी गुलबादीन नबी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या.
पाकिस्तानसाठी हा अफगाणिस्तान दौरा खऱ्या अर्धाने खास ठरला. कारण पाकिस्तानने वनडे मालिका 0-3 अशा अंतराने जिंकलीच. पण सोबतच शनिवारी मिळालेल्या विजयानंतर संघ वनडे क्रमवारीत सर्वोच्च स्थानी पोहोचला. 118 रेटिंग पॉइंट्ससह पाकिस्तान आता वनडे संघांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ 118 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमाकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
IBSA World Games । भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने रचला इतिहास, बनला गोल्ड जिंकणारा पहिला संघ
धोनी आणि मोहीत शर्मात नेहमी होते ‘या’ गोष्टीची चर्चा, वेगवान गोलंदाजाकडून खुलासा