भारतीय संघाची उपांत्य फेरी गाठण्याची आशा अफगाणिस्तानवर टिकून आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये, भारताचा पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाला. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने शेवटच्या दोन सामन्यात अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. यासह भारतीय संघाचे ४ सामन्यात ४ गुण झाले आहेत. त्यांच्या बरोबरीला अफगाणिस्तानचेही ४ गुण आहेत. तर न्यूझीलंडचे ४ सामन्यात ६ गुण आहेत.
रविवारी (७ नोव्हेंबर) होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानला पराभूत केले तर भारतीय संघ स्पर्धे बाहेर पडेल. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानने विजय मिळवला तरच भारतीय संघाच्या आशा पल्लवित होणार आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघासाठी आणि पर्यायाने भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर आली आहे.
अफगाणिस्तानचा ऑफ स्पिनर मुजीब उर रहमान दुखापतीमुळे भारताविरुद्ध खेळू शकला नव्हता. टी-२० विश्वचषकाच्या चालू हंगामात एका डावात ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने स्कॉटलंडविरुद्ध २० धावा देत ५ बळी घेतले होते. तोदुखापतीमुळे टी२० विश्वचषकात आतापर्यंत फक्त २ सामने खेळला आहे. मात्र शनिवारी (६ नोव्हेंबर) त्याने जिममध्ये वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावरुन न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरू शकतो, अशी अपेक्षा दिसते आहे.
#back to gym #mood happy 😃 ⚔️🖤 pic.twitter.com/x1WcWsk5RU
— Muj R 88 (@Mujeeb_R88) November 6, 2021
मुजीब उर रहमानची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द खूप चांगली आहे. त्याने २१ सामन्यात १५ च्या सरासरीने ३१ बळी घेतले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १५.४ आहे. म्हणजेच प्रत्येक सोळाव्या चेंडूवर तो एक विकेट घेतो. एका सामन्यात एकदा ४ विकेट्स आणि एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. इतकेच नाही तर त्याची इकॉनॉमी रेट ५.९६ आहे. ही टी-२० च्या बाबतीत उत्कृष्ट आकडेवारी आहे. त्याने एकूण १५२ टी-२० मध्ये १७१ विकेट घेतल्या आहेत. त्याने ४३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ च्या सरासरीने ७० बळी घेतले आहेत.
अफगाणिस्तान संघ यूएईमध्ये न्यूझीलंडपेक्षा जास्त टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यांची विजयाची टक्केवारीही न्यूझीलंडपेक्षा चांगली आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंड संघाला सामन्यात कडवी टक्कर देऊ शकतो. संघात राशिद खान, मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी असे उत्कृष्ट खेळाडू आहेत. राशिदने चालू विश्वचषकात ४ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सेमीफायनलच्या शर्यतीतील संघांविषयी वसीम जाफरने शेअर केले ‘धमाल’ मीम, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
अफलातून! स्टार्कच्या गोलंदाजीवर रसेलने ठोकला टी-२० विश्वचषकातील सर्वात लांब षटकार, पाहून फिंचही थक्क