विश्वचषक 2023 स्पर्धेतील 10 पैकी 6 संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान संघाचाही समावेश आहे. अफगाणिस्तान संघाने स्पर्धेत सहाव्या स्थानी राहून प्रवास संपवला. सध्या सर्वत्र दिवळी साजरी करत आहेत. याच निमित्ताने अफगाणिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने त्याच्या एका कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. पठ्ठ्याचा अहमदाबादमधील गोरगरिबांना मध्यरात्री पैसे वाटतानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
गुरबाजने गरजूंना वाटले पैसे
अफगाणिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो अहमदाबाद येथील बेघर लोकांप्रती प्रेम दाखवत त्यांची मदत करताना दिसला. 21 वर्षीय गुरबाज या व्हिडिओत फुटपाथवर झोपलेलेल्या लोकांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून मध्यरात्री 3 वाजता त्यांना पैसे वाटताना दिसत आहे. गुरबाजच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.
Rahmanullah Gurbaz silently gave money to the needy people on the streets of Ahmedabad so they could celebrate Diwali.
– A beautiful gesture by Gurbaz. pic.twitter.com/6HY1TqjHg4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
सोशल मीडियावर गुरबाजच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, “अफगाणिस्तानचे खेळाडू मिशनवर आहेत, ज्यात ते खेळाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर मने जिंकत आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “छान कृती.”
गुरबाजची स्पर्धेतील कामगिरी
गुरबाजची विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील कामगिरी पाहायची झालं, तर त्याने स्पर्धेत एकूण 9 सामने खेळले. यादरम्यान त्याने 31.11च्या सरासरीने 280 धावा केल्या. यामध्ये 80 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी ठरली. यावेळी त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही निघाली.
अफगाणिस्तानचे प्रदर्शन
अफगाणिस्तान संघाने स्पर्धेतील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. या विश्वचषकाआधी अफगाणिस्तानच्या नावावर विश्वचषकाच्या इतिहासात फक्त एक विजय होता. मात्र, यावेळी त्यांनी 9 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले. तसेच, 5 सामने गमावले. या 4 विजयांमध्ये त्यांच्या एका मोठ्या उलटफेराचाही समावेश आहे. त्यांनी गतविजेत्या इंग्लंड संघाला 69 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. तसेच, पाकिस्तानविरुद्धही त्यांनी 8 विकेट्सने विजय मिळवला होता. (Afghanistan Opener Rahmanullah Gurbaz Distributes Cash To Homeless People Sleeping On Pavement In Ahmedabad video viral)
हेही वाचा-
विश्वचषकात 500 पेक्षा जास्त धावा खर्च करणारे गोलंदाज, एक बॉलर थोडक्यात वाचला; पाहा यादी
सेमीफायनलमध्ये पावसाने एन्ट्री केली, तर कोण मिळवणार फायलनचे तिकीट? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो