विश्वचषक स्पर्धेत नेहमीच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांनी जगात चर्चा होते. असंच काहीसे विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचेही असते. मात्र, सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांची चर्चा कदाचित कुणालाही करावीशी वाटत नाही. नेहमी म्हटले जात की, गोलंदाज स्पर्धा जिंकून देतात. मात्र, भारतात खेळल्या जात असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेत काही गोलंदाजांना चांगलाच चोप बसला आहे. अशात आपण विश्वचकात सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांबद्दल जाणू घेऊयात. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, या नकोशा विक्रमात भारताचा एकही गोलंदाज नाहीये.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा खर्च करणारे गोलंदाज
1. हॅरिस रौफ- 533 धावा (विश्वचषक 2023)
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) याची गणना जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये होते. मात्र, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा त्याच्यासाठी कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. 9 सामन्यात 79 षटके टाकली. यामध्ये त्याने सर्वाधिक 533 धावा खर्च केल्या. तो विश्वचषकात सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज बनला आहे. यादरम्यान त्याने 6.74 इकॉनॉमीने 16 विकेट्स घेतल्या आहेत.
2. आदिल रशीद- 526 धावा (विश्वचषक 2019)
इंग्लंड संघाने विश्वचषक 2019 (World Cup 2019) स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला होता. मात्र, त्यांच्या एका खेळाडूच्या नावावर खराब विक्रमाची नोंद झाली. तो खेळाडू इतर कुणी नसून फिरकी गोलंदाज आदिल रशीद (Adil Rashid) आहे. त्याने 2019 विश्वचषकात खूपच धावा खर्च केल्या होत्या. त्याने 11 सामन्यात 92 षटके गोलंदाजी करत तब्बल 526 धावा खर्च केल्या होत्या. त्याने यादरम्यान 11 विकेट्सही घेतल्या. मात्र, रौफने 9 सामन्यातच त्याचा विक्रम मोडला.
3. दिलशान मदुशंका- 525 धावा (विश्वचषक 2023)
श्रीलंका संघासाठी वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) हा विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला. त्याने 9 सामन्यात 21 फलंदाजांची विकेट घेतली. मात्र, त्याने यावेळी भरपूर धावाही खर्च केल्या. त्याने 78.2 षटकात 525 धावा खर्च केल्या. त्याने डावात एक वेळा 4 आणि 1 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली.
4. मिचेल स्टार्क- 502 धावा (विश्वचषक 2019)
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा 2019 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. मात्र, त्याच्याविरुद्ध फलंदाजांनी भरपूर धावाही केल्या होत्या. त्याने 10 सामन्यात 27 फलंदाजांना तंबूत धाडलं होतं. यादरम्यान त्याने 92.2 षटके गोलंदाजी करताना 502 धावा खर्च केल्या होत्या. तो कोणत्याही विश्वचषकात 500 धावा खर्च करणारा पहिला वेगवान गोलंदाजही आहे.
5. मुस्तफिजुर रहमान- 484 धावा (विश्वचषक 2019)
बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) याने विश्वचषक 2019 स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली होती. तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी होता. मात्र, त्याच्याविरुद्ध धावाही भरपूर केल्या गेल्या होत्या. त्याने 6.7च्या इकॉनॉमी रेटने 484 धावा खर्च केल्या होत्या. (most runs conceded by a bowler in a single world cup haris rauf cwc 23)
हेही वाचा-
सेमीफायनलमध्ये पावसाने एन्ट्री केली, तर कोण मिळवणार फायलनचे तिकीट? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो
इंग्लंडकडून हारताच बाबरने कुणालाच नाही सोडलं, वाचून काढला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘जर आम्ही…’