बुधवारी (7 सप्टेंबर) पाकिस्तानकडून पराभव स्वीकारल्यानंतर अफगाणिस्तान संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाला. आता पाकिस्तान आणि श्रीलंका संघात 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात परभव स्वीकारावा लागल्यामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू चांगलेच निराश झाले आहेत. सामना संपल्यानंतर त्यांच्यातील काही खेळाडूंना डोळ्यातील पाणी आवरता आले नाही.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना संपल्यानंतर ट्वीटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत अफगाणिस्तानचे खेळाडू अक्षरशः रडताना दिसत आहेत. अफगाणिस्तान संघासाठी ही सामना किती महत्वाचा होता, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होते. परंतु दुर्दैवाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता अफगाणिस्तानला त्यांचा शेवटचा सामना 8 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी खेळायचा आहे.
पराभवानंतर अफगाणिस्तान संघ अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झालाच, पण भारतीय संघाच्या अपेक्षांवर देखील पाणी फेरले गेले आहे. कारण पाकिस्तान या सामन्यात पराभूत झाला असता, तर भारत अंतिम सामन्याच्या शर्यतीत कायम राहिला असता. आता पाकिस्तान आणि श्रीलंका सुपर फोरमध्ये प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात खेळतील.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1567697272250732545?s=20&t=q5XDGp9Z6pUjJ3Wdw3ZZFw
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ मर्यादित 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या 129 धावा करू शकला. इब्राहिम झदरान याने सर्वाधिक धावा केल्या, पण हारिस रउफच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. कर्णधार मोहम्मद नबी एकही धाव करू शकला नाही.
प्रत्युत्तरात पाकिस्तानसाठी 130 धावांचे हे लक्ष्य सोपे पाटत होते, परंतु अफगाणिस्तानी गोलंदाजांना त्यांचा चांगलाच घाम काढला. सामना जिंकळण्यासाठी पाकिस्तानचे फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत झगडताना दिसले. अवघी एक विकेट शिल्लक असताना नसीम शहामुळे त्यांना विजय मिळाला, असे म्हणता योऊ शकते. शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर नसीम शहाने सलग दोन षटकार मारले आणि शेवटचे चार चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘भविष्यात जोरदार पुनरागमन करू!’ राशिद खानने केलाय निर्धार
आख्खं जग वाईट बोलत असताना मिर्झापूरमधल्या ‘बबलू भैया’ने केली कर्णधार रोहितची पाठराखण, शेअर केली खास पोस्ट
भर सामन्यात भांडणं करणं खेळाडूच्या अंगलट! आयसीसीने स्पर्धेतूनंच केलंय बॅन