आशिया चषक स्पर्धेत बुधवार म्हणझेच 7 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानेने हा सामना शेटच्या षटकात जिंकला आणि आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली. दुसरीकडे अफगाणिस्तान संघसाठी मात्र अंतिम सामन्यात पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद झाले. पराभवानंतर अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकी गोलंदाज आणि माजी कर्णधार राशिद खान याने सोशल मीडियावर खास पोस्ट केली. पोस्टमधून दिसून येते की, अफगाणिस्तान संघ पराभवानंतर निराश आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात अफगाणिस्तानने मोठी धावसंख्या केली नव्हती, पण तरीही गोलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. शेवटच्या षटकात नसीम शाहा (Naseem Shah) याने षटकार मारल्यामुळे पाकिस्तानने विजय मिळवला. आता अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमने सामने असतील. या दोन्ही संघांनी सुपर फोरमध्ये प्रत्येक दोन-दोन विजय मिळवले आहेत. दुसरीकडे भारत आणि अफगाणिस्तान यांनी मात्र सुपर फोरमधील त्यांचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत.
अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न भंगल्यानंतर राशिद खान (Rashid Khan) सोशल मीडियावर व्यक्त झाला. त्याने अधिकृत ट्वीटर खात्यावरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही शेवटपर्यंत लढलो आणि मला माझ्या संघावर खूप अभिमान आहे. आम्ही शिकत राहू आणि इंशाल्लाह जोरदार पुनरागमन करू.” दरम्यान, अफगाणिस्तान संघाने जर या सामन्यात काही धावा जास्त केल्या असत्या, तर त्यांचा संघ विजय मिळवू शकत होता.
https://twitter.com/rashidkhan_19/status/1567591826332205060?s=20&t=EcA1ylj042q7KVcSob6_hw
उभय संघातील या सामन्याचा एकंदरित विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली, पण मधल्या षटकांमध्ये त्यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. अफगाणिस्तानने मर्यादित 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 129 धावा केल्या. त्यांना मोठे लक्ष्य उभे केले नसले तरी, गोलंदाजांनी मात्र जबरदस्त प्रदर्शन करून पाकिस्तानचा घाम काढला. सुरुवातील सोपे वाटणारे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले आणि त्यांनी 9 विकेट्सही गमावल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषक जिंकण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडला सामोरे जावे लागेल, वाचा T20WCचे सुधारित वेळापत्रक
INDvsAFG सामन्यात ‘हे’ खेळाडू करणार खास खेळी! वाचा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग अन् सामन्याची फॅन्टसी 11
ASIA CUP: शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचे हे खेळाडू भारतासाठी काळ ठरणार!






