भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अपगाणिस्तान संघ 5 विकेट्सच्या नुकसानावर 158 धावांपर्यंत मजल मारू शकला.
अफगाणिस्तानचा सलामीवीर हमनुल्लाह गुरबाझ (Rahmanullah Gurbaz) आणि इब्राहिम झद्रान (Ibrahim Zadran) यांनी अनुक्रमे 23 आणि 25 धावांची खेळी केली. अब्दुल्ला ओमरझाई (Azmatullah Omarzai) यांने 29 धावांचे योगदान दिले. रहमत शाह अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने सर्वाधिक 42 धावा केल्या. नजीबुल्लाह नबी याने 19* आणि करीम जनात 9* धावा करून शेवटपर्यंत विकेट गमावली नाही.
भारतासाठी मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. कुमेशने 4 षटकात 33 धावा खर्च केल्या, तर अक्षरने 4 षटकांमध्ये 23 धावा दिल्या. शिवम दुबे याने 2 षटकात 9 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांपैकी अर्शदीपसिंग याने 28, वॉशिंगटन सुंदर याने 27 आणि रवी बिश्नोई याने 35 धावा खर्च केल्या. पण या तिघांपैकी एकालाही विकेट घेता आली नाही. (Afghanistan post a respectable total of 158 against India in Mohali. )
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अब्दुल्ला ओमरझाई, नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
Australian Open 2024: ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ जाहीर, पाहा जोकोविचसमोर आहे कुणाचे आव्हान
IND vs AFG । पहिल्या टी20तून विराटनंतर जयस्वालची माघार, नाणेफेक जिंकून रोहितने घेतली गोलंदाजी