Australian Open 2024: 2024 ची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 14 जानेवारी पासून चालू होणार असून, याबद्दलची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. दरवर्षीप्रमाणे मेलबर्न पार्कवर ही स्पर्धा आयोजित केली जाईल, जिथे जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू सहभागी होतील.
या वर्षातील पहिल्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेचा ‘ड्रॉ’ जाहिर झाला असून, अर्थातच सर्वांचे लक्ष 24 वेळचा ग्रॅंडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचवर राहील. त्यातच मागचा विंब्लडन विजेता स्पेनचा कार्लोस अल्कारेज आणि नोव्हाक जोकोविच यांची पून्हा एकदा फायनलमध्ये भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामूळे स्पर्धेअगोदरच उत्सूकतेत वाढ झाली आहे.
असे होतील सामने
जोकोविचचे सूरूवातीचे सामने सोप्पे असले तरी, उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना ग्रीकच्या स्टेफानोस सित्सिपास सोबत होऊ शकतो. सित्सिपास सध्या जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर आहे. दूसरीकडे, कार्लोस अल्कारेज आणि रशियाचा डॅनिल मेडवेदेव आपापले सामने दूसऱ्या गटात खेळतील. मेडवेदेव आपला पहिला सामना रिचर्ड गॅस्केटशी खेळेल. तर अल्कारेज पूढे जागतिक क्रमवारीत 31 व्या स्थानावर असलेला अलेक्झांडर बूब्लिक संभाव्य तिसऱ्या फेरीत आव्हान देऊ शकेल. सोबतीलाच, जोकोविचचा ऐतिहासिक प्रतिस्पर्धी अँडी मरे यांचा तिसऱ्या फेरीतील होणारा संभाव्य सामना सर्वांचे आकर्षण राहिल. (Djokovic could face Murray in R3 Australian Open blockbuster)
ऑस्ट्रेलियन ओपनचा ‘बादशाह’ जोकोविच
नोव्हाक जोकोविचने तब्बल 10 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2005 पासून तो ही स्पर्धा खेळत आहे. यात खेळलेल्या एकूण 97 सामन्यांपैकी 89 विजय मिळवत मेलबर्नवर त्याने ‘राज्य’ केले आहे. तसेच 2018 पासून तो येथे एकही सामना हरलेला नाही हे विशेष. यावर्षी त्याला कोण रोखेल याकडे सर्वांचे लक्ष राहील. (Why Novak Djokovic is favorite to win Australian Open 2024 men’s singles title)
कधी आणि कूठे बघता येतील सामने
सामने भारतीय वेळेनूसार सकाळी 7:30 वाजता चालू होतील. भारतात या स्पर्धेचे प्रक्षेपण मात्र होणार नसल्याचे वृत्त आहे. सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म मात्र या स्पर्धेचे सामने पाहाता येतील.
महत्वाच्या बातम्या
‘आम्ही मालिका जिंकणार नव्हतोच…’, सिडनी कसोटीबाबत शाहीन आफ्रिदीचे मोठे विधान, वाचा सविस्तर
‘कोण विराट? मी नाही ओळखत…’, चाहत्याच्या प्रश्नावर रोनाल्डोचं उत्तर