---Advertisement---

कॅमरुन बॅनक्रॉफ्टला कसोटी संघात संधी का नाही? मुख्य निवडकर्त्यांनी बॉल टॅम्परिंगचा उल्लेख करत सांगितले कारण

Cameron Bancroft
---Advertisement---

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेटने वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी संघ घोषित केला. डेव्हिड वॉर्नर याने वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती नुकतीच घेतली. अशात वॉर्नरची संघातील जागा कोण भरून काढणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनुभवी कॅमरून बॅनक्रॉफ्ट याचे नाव कसोटी मालिकेसाठी चर्चेत होते. पण त्याच्या आधी मॅट रेनशॉ याला संधी मिळाली. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

कॅमरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) याने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा कसोटी सामना 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने वा संघात सामील केले जाईल, अशा चर्चा सुरू होत्या. पण प्रत्यक्षात संघ घोषित झाल्यानंतर त्याने नाव संघात नव्हते. अशातच बॅनक्रॉफ्टला संघात न निवडण्यामागे 2018 साली झालेले ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरण आहे, असे बोलले जाऊ लागले. पण आता ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी या चर्चा चुकीच्या ठरवल्या आहेत. बेली यांनी म्हटल्याप्रमाणे बॅनक्रॉफ्टला संघात न निवडण्याचा निर्णय फक्त आणि फक्त त्याच्या क्रिकेटच्या आधारे घेतला गेला आहे.

इएसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार जॉर्ज बेली म्हणाले की, “मी कॅमरूनसोबत अनेकदा याविषयी बोललो आहे. निवड समितीनेही निवड करताना कधीच अशा (बॉल टॅम्परिंग प्रकरणा) पद्धतीने विचार केला नाही. हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटच्या आधारे घेतला गेला आहे. संघात असा एकही सदस्य नाही, ज्याला कॅम संघात असल्यावर अडचण असेल. आम्हाला कॅमरुनची काहीच अडचण नाहीये. लोक असा विचार करत असतील, तर मला यासाठी वाईट वाटते. मी तुमच्या आणि कॅमरुच्या समोर हे पुन्हा एकदा सांगू शकतो की, असे (बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे त्याला संधी मिळाली नाही) काहीच नाहीये.”

वेस्ट इंडीविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ – 
पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स केरी, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, मॅट रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क. (Australia’s chief selector George Bailey has revealed the reason for not picking Cameron Bancroft in the Test squad)

महत्वाच्या बातम्या – 
Video: चाहत्यानी सर्वांसमोरच धरले राहुलचे पाय, यष्टीरक्षकाच्या कृतीने जिंकली लोकांची मने
‘आम्ही मालिका जिंकणार नव्हतोच…’, सिडनी कसोटीबाबत शाहीन आफ्रिदीचे मोठे विधान, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---