भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सध्या मैदानापासून दूर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही. दरम्यान, राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा एक चाहता सर्वांसमोर त्याच्या पायाला हात लावण्यासाठी वाकतो तेव्हा हा भारतीय क्रिकेटर लगेच रिअॅक्ट करतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, केएल राहुल (Kl Rahul) याने सेंच्युरियन येथे कठीण परिस्थितीत शतक झळकावले होते. अफगाणिस्तानविरुद्ध गुरुवारपासून (11 जानेवारी) सुरू होणाऱ्या टी20 मालिके त्याने चांगली कामगिरी केली होती, पण तरीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जवळ आल्याने संजू सॅमसन (Sanju Samson) आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) यांना यष्टिरक्षक म्हणून संघात संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या दोघांना आंतरराष्ट्रीय मंचावर आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल एका रेस्टॉरंटमधून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात त्याचे काही चाहते येतात आणि उभा राहतात. दोन चाहत्यांनी त्याच्या पायांना हात लावण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्यांना थांबवले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला.
https://twitter.com/i/status/1744999876700897328
यापूर्वी बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) तब्बल 14 महिन्यांनंतर टी20 संघात परतले आहेत. या मालिकेत रोहित कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टी20 मालिकेत सहभागी होणार नाहीत. केएल राहुललाही संघात संधी मिळालेली नाही. (The fans held Rahul’s feet in front of everyone the wicketkeeper’s actions won everyone’s hearts)
हेही वाचा
“भारताच्या वनडे आणि टी20 संघात ‘हा’ खेळाडू खूप महत्त्वाचा”, युवा फलंदाजाबद्दल माजी क्रिकेटपटूचं विधान
‘फक्त या कारणांमुळे झाला टीम इंडियाचा पराभव’, भर पत्रकार परिषदेत कोचने सांगितले कारण