झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान खेळणार नाही. या अनुभवी लेगस्पिनरने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे.
राशिदनं शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये खेळला होता. गेल्या तीन वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत नसलेल्या राशिदच्या पाठीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून कदाचित याच कारणामुळे तो झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी देखील संघात निवड केली नव्हती.
अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये सराव करत असून राशिद त्यात सहभागी झालेला नाही. बोर्डानं मंगळवारी ट्रेनिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले, पण राशिद एकाही फोटोमध्ये दिसला नाही. राशिदने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तो नेदरलँडमध्ये दिसत आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं राशिदच्या उपलब्धतेबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलेलं नाही. परंतु एकाच वेळी आलेल्या या दोन फोटोंमुळे चित्र स्पष्ट झालं. नंतर बोर्डाच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली की राशिद पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही. तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची अपेक्षा आहे.
पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर राशिद अतिशय सावधपणे खेळत आहे. त्याच्या डॉक्टरांनी त्याला कसोटी क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटीतून माझार घेतल्यानंतर त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, राशिद संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. आता तो दुसऱ्या कसोटीत खेळतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत, 5 क्रिकेटपटू ज्यांच्या घरी यावर्षी पाळणा हलला
मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन घोषित, घातक खेळाडूचं पदार्पण
सिराजला डच्चू! दोन फिरकीपटूंसह उतरणार टीम इंडिया? बॉक्सिंग डे कसोटीत अशी असेल भारताची प्लेइंग 11