आधुनिक युगात, टी-२० क्रिकेटविश्वातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून राशिद खानला ओळखले जाते. या खेळाडूने आपल्या फिरकीच्या जादूने पूर्ण क्रिकेटविश्वात धुमाकूळ घातला आहे. चांगल्यातले चांगले फलंदाज हे राशिद खानच्या फिरकीत फसले आहेत. राशिद खान हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करतो. परंतु याच राशिदला क्रिकेटपटू नव्हे तर एक मोठा डॉक्टर बनवण्याचे स्वप्न त्याच्या आई-वडिलांनी पाहिले होते.
राशिद खानने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने क्रिकेटपटू बनण्यासाठी खूप मेहनत व परिश्रम घेतले आहेत. परंतु त्याच्या आई-वडीलांचे स्वप्ने होते की त्याने मोठे होऊन डॉक्टर बनावे. कारण त्यांच्या कुटुंबात कोणीच डॉक्टर नव्हते. त्यामुळे त्याला क्रिकेट खेळण्याची परवानगी नव्हती.
मी अभ्यासातही हुशार होतो
राशिद खानने पाकिस्तानी पत्रकार सावेरा पाशासोबत बोलताना सांगितले की, “मला क्रिकेट खेळण्याची परवानगी नव्हती. मी अभ्यासात खूप हुशार होतो. माझ्या घरीही कोणीडॉक्टर नव्हते. त्यामुळे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते की, मी मोठे झाल्यावर डॉक्टर बनावे. परंतु मला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. म्हणून मी घरी न सांगता क्रिकेट सामने खेळायला जायचो.”
महत्त्वाचे म्हणजे, राशिदने आपल्यातील क्रिकेट कौशल्य वाढवण्यासाठी कोणतीच ट्रेनिंग किंवा तो कधी कोणती अकॅडमीमध्ये गेला नाही. त्याचे म्हणणे आहे की, त्याची फिरकी गोलंदाजी हे त्याचे नैसर्गिक कौशल्य आहे. त्यामुळे त्याने आज त्याच्या कारर्कीदीमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे.
राशिद खान पुढे म्हणाला, “मी कधी कोणत्या क्लब किंवा अकॅडमीमध्ये गेलो नाही. माझे मित्र मला सामना खेळण्यासाठी नेत. तिथे मी फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उल्लेखनीय प्रदर्शन करायचो. राहिला तो माझ्या प्रशिक्षणाचा प्रश्न. मी कधीही कोणत्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले नाही. माझा खेळ हा पूर्णपणे नैसर्गिक आहे. तेच मला मोठा खेळाडू बनवण्यासाठी मदद करते.”
आयपीएलमध्ये राशिद हा सनराइजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू आहे व तो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाचा महत्वपूर्ण सदस्य आहे.
महत्वाच्या बातम्या
मांजरेकरांसोबतच्या पर्सनल चॅटिंगचे मेसेज फॅनकडून व्हायरल, पाहा काय म्हणालेत मांजरेकर जडेजाबद्दल
क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! कर्णधार अन् सलामीवीराची जोडी करतेय कसून सराव