---Advertisement---

T20 WC26: अफगाणिस्तानने यूएईविरुद्धच्या विजयाने उघडले स्पर्धेचे खाते, दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मध्ये प्रवेश

On: सोमवार, फेब्रुवारी 16, 2026 3:30 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत २८वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध यूएई आज (सोमवारी, १६ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये अफगाणिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. याबरोबरच त्यांचे स्पर्धेतील विजयाचे खाते उघडले आहे. या विजयाचा दक्षिण आफ्रिकेलाही फायदा झाला आहे. त्यांना स्पर्धेच्या सुपर-८चे तिकीट मिळाले आहे. अझमतुल्लाह उमरजईने अष्टपैलू खेळी केल्याने तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकला आणि यूएईने प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले अफगाणिस्तानने हे लक्ष्य १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.

यूएईकडून सोहेब खानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ६८ धावा केल्या. त्याबरोबरच त्याने आलिशान शराफूसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची (५७ चेंडू) भागीदारी केली. केवळ हीच त्यांची मोठी भागीदारी ठरली. त्यामुळे यूईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १६० धावा केल्या. उमरजईने ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच मुजीब उर रहमान यानेही दोन विकेट्स घेतल्या. राशिद खानने घेतलेली एकमेव विकेट त्याच्या टी२० कारकिर्दीतील ७००वी विकेट ठरली. हा एक विश्वविक्रम ठरला.

लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने रहमानुल्लाह गुरबाझची विकेट लवकरच गमावली. त्यानंतर इब्राहिम जादरानने अर्धशतकी खेळी केली आणि संघाचा धावफलक हलता ठेवला. त्याने दुसऱ्या विकेटसाठी गुलबदिन नईबसोबत ४० धावांची भागीदारी केली. इब्राहिम ४१ चेंडूत ५३ धावा करत बाद झाला. त्यानंतर दारविश रसूली आणि उमरजईसोबत पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. रसूली ३३ धावा करत बाद झाला आणि उमरजई २१ चेंडूत ४० धावा करत नाबाद राहिला.

या सामन्यानंतर ग्रुप डी च्या गुणतालिकेत बदल झाला आहे. अफगाणिस्तान ३ पैकी एक सामना जिंकत २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आला आहे. युएईनेही ३ पैकी एक सामना जिंकला, मात्र त्यांचा नेट रनरेट कमी असल्याने ते चौथ्या स्थानावर आहेत.

अफगाणिस्तानचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध आहे. त्यांना जर सुपर ८ मध्ये जायचे असेल तर कॅनडाविरुद्ध जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच न्यूझीलंडचा सामनाही कॅनडा विरुद्ध आहे. यामध्ये न्यूझीलंड जिंकला तर ते सुपर ८ मध्ये जातील आणि अफगाणिस्तान बाहेर पडतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---