आयसीसी वनडे विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तनचा 15 सदस्यीय संघ आणि सपोर्ट स्टाफ भारतात दाखल झाला आहे. 5 ऑक्टोबर रोजी भारतात वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्पर्धेसाठी आवश्यक पूर्ण तयारी करत आहे. मंगळवारी (26 सप्टेंबर) अफगाणिस्तान संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
वनडे विश्वचषकात अफगाणिस्तान संघाला आपल्या अभियानाची सुरुवात 7 ऑक्टोबर रोजी करायची आहे. त्यांचा पहिला सामना बांगलादेशसोबत असेल. विश्वचषकासाठी अफगाणिस्तानने निवडलेल्या संघातील राशिद खान याच्यासह काही खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडून वेगवेगळ्या संघांसाठी खेळत असतात.
AfghanAtalan have arrived in Thiruvananthapuram, India, ahead of their first warmup match against South Africa this Friday. ????#AfghanAtalan | #CWC23 | #WarzaMaidanGata pic.twitter.com/TcIST78syk
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 26, 2023
यजमान भारत आणि अफगाणिस्तान (India Vs Australia) यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अफगाणिस्तान संघ लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना 10 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळेल. स्पर्धेचे उपांत्य फेरी 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून अंतिम सामना 19 नव्हेंबर रोजी खेळला जाईल. (Afghanistan team arrives in India for World Cup 2023)
वनडे विश्वचषक 2023साठी निवडला गेलेला भारतीय संघ –
हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय
वर्ल्डकप काऊंटडाऊन: विश्वचषक इतिहासात ‘अशी’ बॉलिंग फिगर टाकायची डेरिंग त्याच्याशिवाय कुणीच केली नाही, वाचाच