---Advertisement---

भारतात क्रिकेट खेळायचं असेल तर या देशाबरोबरही एक सामना खेळा!

On: शुक्रवार, जून 1, 2018 1:49 PM
---Advertisement---

मुंबई | कोणत्याही देशाने भारत दौऱ्यावर आल्यावर यापुढे एक सराव सामना अफगाणिस्तानसोबत खेळावा लागणार आहे. याची घोषणा बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी काबुल येथे केली.

ते सध्या अफगाणिस्तान भेटीवर आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील द्विपक्षिय संबंधांवर चर्चा करण्यासाठी सध्या ते या दौऱ्यावर गेले आहेत.

यामुळे अफगाणिस्तानमधील खेळाडूंचा अात्मविश्वास वाढेल तसेच त्यांना मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळायला याची मदत होईल असे ते यावेळी म्हणाले.

अफगाणिस्तान त्यांचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध ह्या महिन्यात खेळत आहे. हा सामना १४ ते १८ जुन दरम्यान बेंगलोर येथे होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment