---Advertisement---

अफगाणिस्तानने रचला इतिहास! थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात करत केला अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश

On: शुक्रवार, जानेवारी 28, 2022 9:22 AM
afghanistan u19
---Advertisement---

वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक (U19 Cricket World Cup 2022 West Indies) स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इतिहास रचला आहे (Afghanistan Into U19 World Cup Semifinal). त्यांनी क्रिकेटच्या प्रत्येक विभागात श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. यासह उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंडनंतरचा हा दुसरा संघ ठरला आहे. गुरूवारी (२७ जानेवारी) रोजी संध्याकाळी खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ४ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने आपल्या सर्वात कमी धावसंख्येचा (१३४) धावांचा बचाव करताना हा विजय नोंदवला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४७.१ षटकात १३४ धावा करून अफगाणिस्तान संघ सर्वबाद झाला. अफगाण संघाकडून अब्दुल हैदीने ३७ धावा केल्या. त्याच्याशिवाय अल्लाह नूरने २५ आणि नूर अहमदने (Noor Ahmed) १५ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेसाठी विनुजा रनपुल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ९.१ षटकात १० धावांत ५ बळी घेतले. त्याच्याशिवाय कर्णधार ड्युनिथने ३६ धावांत ३ फलंदाज बाद केले.

विजयासाठी श्रीलंकेसमोर १३५ धावांचे सोपे लक्ष्य होते. मात्र, अफगाणिस्तानच्या धारदार गोलंदाजीपुढे त्यांचा संपूर्ण संघ ४६ षटकांत १३६ धावांत गारद झाला. परिणामी, अफगाणिस्तानने हा सामना ४ धावांनी जिंकला. श्रीलंकेकडून कर्णधार ड्युनिथने सर्वाधिक ३४ धावा केल्या. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना बलाढ्य इंग्लंड संघाशी होईल. इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

भारत-पाकिस्तान होऊ शकतो उपांत्य सामना
भारतीय संघ त्याचा उपांत्यपूर्व सामना २९ जानेवारीला बांगलादेशविरुद्ध खेळले. तर पाकिस्तान संघ २८ जानेवारीला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उपांत्यपूर्वी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघाने विजय मिळविल्यास क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा या परंपरागत प्रतिस्पर्धींना दोन हात करताना पाहण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. (INDvPAK)

महत्वाच्या ‌बातम्या-

‘कोणीही टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्यास नाही तयार, पण मी मात्र…’; शमीला नक्की म्हणायचंय तरी काय? (mahasports.in)

कर्णधार रोहितला थोडाही नाही आवडला ‘हा’ खेळाडू! फक्त २ सामने खेळवून केली वनडेतून हाकालपट्टी (mahasports.in)

मेगा लिलावापूर्वी ‘थला’ चेन्नईत दाखल! १५ वर्षांत पहिल्यांदाच दिसणार ‘ते’ चित्र? (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---