---Advertisement---

‘कोणीही टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्यास नाही तयार, पण मी मात्र…’; शमीला नक्की म्हणायचंय तरी काय?

On: गुरूवार, जानेवारी 27, 2022 5:49 PM
ind v sa
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मोहम्मद शमी (Mohammad Shami) ने आता मोठे व्यक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा (Virat Step Down As Test Captaincy) दिला. यानंतर कसोटी कर्णधार कोण यावर चर्चा सुरु आहे. यावर आता मोहम्मद शमीने आपलं मत मांडलं (Mohammad Shami On Test Captaincy) आहे.

भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद ही कोणत्याही खेळाडूसाठी सन्मानाची बाब आहे. संघ त्याच्यावर जी जबाबदारी सोपवेल त्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे, असे शमीने म्हटले आहे. तसेच त्याने आयपीएल लिलावाबाबत त्याचं मत मांडल आहे. तो या आयपीएल मोसमात कोणत्याही संघाकडून खेळण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले आहे. 

व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय ।

मी कोणत्याही जबाबदारीसाठी तयार
‘इंडीया डाॅट काॅम’शी संवाद साधताना शमी म्हणाला की, “मी सध्या कर्णधारपदाबाबत जास्त विचार करत नाही. माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल, त्यासाठी मी तयार आहे. खरे सांगायचे तर कोणत्याही खेळाडूला भारतीय संघाचे नेतृत्व करायचे नाही. पण ही केवळ एक गोष्ट नाही. मला भारतीय संघासाठी शक्य तितके योगदान द्यायचे आहे.”

कोणत्याही प्रकारात खेळण्यास तयार
मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका मालिकेत भारतीय वनडे संघाचा भाग नव्हता, पण त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची पुन्हा संधी हवी आहे. तो म्हणाला की, तो सर्व प्रकारांमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे आणि छोट्या प्रकारांमध्ये त्याचे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी उत्सुक आहे.

हेही वाचा- शेवटचे षटक, १२ धावांची गरज अन् २ चेंडूंवर गेल्या २ विकेट्स, सिडनी सिक्सर्सची अशी फायनलमध्ये धडक

आयपीएलसाठी कोणत्याही संघात खेळण्यास तयार 
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ जानेवारीला होणार आहे. मोहम्मद शमीला पंजाब किंग्सने रिटेन केलेले नाही. त्यातचं बाकी फ्रॅंचायझी ३१ वर्षीय शमीवर बोली लावू शकतात. त्याच्या मते तो कोणत्याही संघात खेळण्यास तयार आहे. आयपीएल २०२२ बाबत बोलताना शमी म्हणाला, “आयपीएल लिलावात मी येईन. मला निवडणाऱ्या कोणत्याही फ्रॅंचायझीसाठी खेळण्यास मी तयार आहे. लिलावामध्ये काय होइल याचा अंदाज बांधू शकत नाही.”

नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी हा भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. या मालिकेत भारताचा २-१ ने पराभव झाला. शमीने त्या तीन सामन्यांत १४ विकेट घेतल्या. भारताने कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिका गमावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी रोहितने घटवलं ‘इतके’ किलो वजन, फोटो भन्नाट व्हायरल

शेवटचे षटक, १२ धावांची गरज अन् २ चेंडूंवर गेल्या २ विकेट्स, सिडनी सिक्सर्सची अशी फायनलमध्ये धडक

‘मला भेटलेल्या सर्व क्रिकेटपटूंपैकी धोनी सर्वात हुशार’, भारतात अपमान झालेला ऑस्ट्रेलियन दिग्गज करतोय कौतुक

हेही पाहा-

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---