---Advertisement---

दुनिया गोल आहे, आयपीएलचा विषय खोल आहे! पाहा असं का म्हटलं जातंय?

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 12:31 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या हंगामात आत्तापर्यंत १२ सामने झाले आहेत. हे बाराही सामने रोमांचक ठरले. अनेकदा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. विशेष म्हणजे १२ सामन्यांपैकी २ सामने सुपर ओव्हरमध्येही गेले.

बुधवारी(३० सप्टेंबर) आयपीएल २०२० मध्ये १२ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई येथे पार पडला. या सामन्यात कोलकाताने ३७ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील दुसरा विजय संपादित केला. तसेच राजस्थानचा मात्र या हंगामातील हा पहिला पराभव होता. याआधी त्यांनी त्यांचे दोन्ही सामने जिंकले होते.

त्यामुळे आता आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या नावावर किमान १ तरी पराभव आणि १ तरी विजयाची नोंद झाली आहे. तसेच यामुळे एकप्रकारे विजय आणि पराभवाचे एक वर्तुळच पूर्ण झाले आहे. कारण यंदा सुरुवातीला कोणत्याच एका संघाचे वर्चस्व राहिलेले दिसलेले नाही. प्रत्येक संघच यावेळी मजबूत दिसत आहे. प्रत्येक सामन्यागणिक गुणतालिकेतही मोठा बदल झालेला दिसत आहे.

आयपीएल २०२० च्या पहिल्या १२ सामन्यांनंतर विजय आणि पराभवाचे एक वर्तुळ झाले पूर्ण
मुंबई इंडियन्स पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स पराभूत विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स पराभूत विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पराभूत विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
किंग्स इलेव्हन पंजाब पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स पराभूत विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्स पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स

प्रत्येक संघाचा किमान एक विजय आणि एक पराभव –
एवढेच नाही तर आयपीएलचा हा पहिला असा हंगाम आहे, ज्यात पहिल्या १२ सामन्यातच प्रत्येक संघाच्या नावावर विजय आणि पराभवाची नोंद झाली आहे. याआधी २०१७ च्या हंगामात पहिल्या १३ सामन्यांनंतर प्रत्येक संघाने किमान १ विजय आणि १ पराभव स्विकारला होता.

प्रत्येक संघाने आत्तापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यातील राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबने प्रत्येकी १ सामना जिंकला आहे.

त्यामुळे सध्या नेट रन रेटच्या आधारे संघांनी गुणतालिकेत आपली क्रमवारी निश्चित केली आहे. सध्या अव्वल क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे. तर बुधवारी मिळवलेल्या विजयामुळे कोलकाता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान असून चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे. तर पंजाब पाचव्या, मुंबई सहाव्या, हैदराबाद सातव्या आणि चेन्नई आठव्या क्रमांकावर आहे.

प्रत्येक संघाला किमान १ विजय आणि १ पराभवाची नोंद करण्यासाठी सर्वात कमी सामने लागलेले आयपीएल हंगाम-
१२ सामने – आयपीएल २०२०
१२ सामने  – आयपीएल २०१७
१५ सामने – आयपीएल २०१६
१६ सामने – आयपीएल २०१०
१६ सामने – आयपीएल २०११
१६ सामने – आयपीएल २०१८

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---