2017 चा महिला विश्वचषकाचा अंतिम सामन्याला सोमवारी (23 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा फक्त 9 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला.
इंग्लंडच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी वेगवान गोलंदाज अन्या श्राब्सोलनेच भारताची शेवटची विकेट घेत इंग्लंडला विश्वचषक मिळवून दिला होता. तिने या सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तिला सामनावीराचाही पुरस्कार जाहीर झाला.
16 वर्षांपूर्वी पाहिलेले हे स्वप्न अशी अफलातून कामगिरी करत आणि तेही लॉर्ड्ससारख्या एेतिहासिक मैदानावर तिने पूर्ण केले होते. तिच्या या स्वप्नवत सत्याचा प्रवास दोन फोटोंमधून आयसीसीने दाखवला आहे.
यातील एका फोटोत ती 2001 साली लॉर्ड्सच्या मैदानावर उभी आहे. तर याच दुसऱ्या फोटोत 2017 च्या विश्वचषका दरम्यान लॉर्ड्सच्याच मैदानावर उभी आहे. विषेश म्हणजे दोन्ही फोटोत तिची उभी राहण्याची जागा सारखीच आहे.
त्यामुळे हे दोन्ही फोटो सारखेच असल्यासारखे वाटतात मात्र यात एकच फरक आहे तो म्हणजे एका फोटोत10 वर्षांची असलेली अन्या आहे, तर दुसऱ्यामध्ये 25 वर्षीय इंग्लंडची विश्वविजेती राष्ट्रीय खेळाडू.
2001 dream ➡️ 2017 reality. #MondayMotivation pic.twitter.com/ct3TZJTJuN
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 23, 2018
वेगवान गोलंदाज असलेली अन्या लहान असल्यापासून क्रिकेट खेळते. तिचे वडीलही क्रिकेटपटू होते. ती 12 वर्षांची असल्यापासून स्थानिक बाथ क्रिकेट क्लबकडून मुलांबरोबर खेळायची.
तसेच ती13 वर्षांची असतानाच सोमरसेट अकादमीमध्ये सामील झाली होती. या आकादमीमध्ये सहभागी होणारी ती पहिलीच मुलगी ठरली होती.
तिने सोमरसेटकडून केलेल्या कामगिरीच्या जोरावर तिची 17 व्या वर्षीच इंग्लंड संघात निवड झाली. तिने इंग्लंडकडून आत्तापर्यंत वनडेत 55 सामने खेळताना 27.57 च्या सरासरीने 68 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच तिने टी20मध्येही उत्कृष्ट गोलंदाजी करताना 54 सामन्यात 13.81 च्या सरासरीने 74 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत मात्र ती 5 सामनेच खेळली असून यात तिने 17 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट