---Advertisement---

सामन्यानंतर का भडकला कॅप्टन रोहित? तीन वर्षांनंतर शतकाच्या प्रश्नावर म्हणाला, ‘खरं काय ते दाखवलं पाहिजे’

On: बुधवार, जानेवारी 25, 2023 4:36 PM
Captain Rohit Sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांची वनडे मालिका संपली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे मंगळवारी (दि. 24 जानेवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवला. तसेच, मालिका 3-0ने नावावर केली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने शतक झळकावले. विशेष म्हणजे, हे रोहितचे 3 वर्षांनंतरचे पहिले शतक होते. मात्र, सामन्यानंतर रोहित भलताच संतापल्याचे दिसला. काय होते यामागील कारण चला जाणून घेऊयात.

भारताच्या विजयात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्या शतकाचा मोलाचा वाटा होता. दोघांनीही संघाला शानदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनीही 212 धावांची भागीदारी रचली. सामन्यानंतर रोहित चिडल्याचे दिसला. कारण, ब्रॉडकास्टरने हे रोहितचे तीन वर्षातील पहिले शतक असल्याचे म्हटले होते.

पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला की, “3 वर्षात शतक करण्याचा प्रश्न असेल, तर मी 3 वर्षात फक्त 12 (17) सामने खेळलो आहे. तीन वर्षे बोलताना खूप वाटतात. तुम्हाला समजले पाहिजे की, काय घडत आहे. मला माहितीये की, हे टीव्हीवर दाखवले गेले, परंतु कधी-कधी त्या गोष्टींवरही लक्ष दिले पाहिजे. ब्रॉडकास्टरनेही योग्य गोष्टी दाखवल्या पाहिजेत.”

पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “सन 2020पासून कोणताही सामना नव्हता. कोव्हिड-19मुळे आम्ही सर्वजण घरातच बसून होतो. आम्ही फार कमी सामने खेळलो. त्यानंतर मागील वर्षी टी20 विश्वचषकामुळे आम्ही जास्त वनडे सामने खेळलो नाही. टी20 क्रिकेट खेळलो. टी20त सूर्यकुमार यादवशिवाय कुणी शतक केले असेल, असे मला वाटत नाही. मी दुखापतग्रस्तही राहिलो. त्यादरम्यान मी फक्त दोन कसोटी सामने खेळलो. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत.”

भारत बनला अव्वल संघ
भारतीय संघाने मंगळवारी (दि. 24 जानेवारी) न्यूझीलंडला वनडेत पराभूत करत 3-0ने मालिका नावावर केली. यासह भारताने आयसीसीच्या वनडे संघांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. भारताने इंदोरच्या होळकर स्टेडिअमममध्ये 90 धावांच्या फरकाने विजय साकारला. रोहितने या विजयात 85 चेंडूत 101 धावा चोपल्या. हे त्याचे वनडेतील दुसरे सर्वात वेगवान शतक होते. (after 3 years century controversy rohit sharma angry read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सलामीवीर जखमी, बाहेर पडणार?
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---