आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला. आयपीएलमध्ये नव्याने सहभागी घेणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्सने दोन अशा खेळाडूंना संघात सामील केले, जे एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत. दीपक हुडा (deepak hooda) आणि कृणाल पंड्या (krunal pandya) यांच्यात मागच्या वर्षी मोठा वाद झाला होता. मात्र, आयपीएलच्या पुढच्या हंगामात आता ते एक ड्रेसिंग रूम शेअर करणार आहेत. याचा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
मेगा लिलावात अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंवर बोली लागली. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझींमुळे स्पर्धेत आता आठ ऐवजी १० संघ आमने सामने असणार आहेत. याच कारणास्तव मेगा लिलावाही अधिक रंजक ठरला. मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हुडा आणि कृणाल यांच्यात वाद झाला होता. आता पुढच्या आयपीएल हंगामात मात्र ते दोघे लखनऊ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. लखनऊने दीपक हुडासाठी ५.७५ कोटी रुपये खर्च केले. तर कृणाल पंड्याला संघात घेण्यासठी तब्बल ८.२५ कोटी रुपये मोजावे लागले. सोशल मीडियावर लखनऊच्या संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Deepak Hooda and Krunal Pandya in the Same Team now 🤣⚡
Scenes from LSG camp* #IPLMegaAuction pic.twitter.com/mp5HT267px
— Vedang 2.0 (@vedkagyaan) February 12, 2022
Deepak Hooda to Lucknow team management when they bought Krunal Pandya:#IPLAuction #IPL2022MegaAuction pic.twitter.com/vIlUpdtBlW
— Bruce Wayne (@BruceWayne_42) February 12, 2022
Krunal pandya angry on lucknow franchise for purchasing Deepak hooda for 5.75 crores. pic.twitter.com/xutYnsbMdh
— A.V. Raja Sekhar (@raju_tweets9) February 12, 2022
Gambhir bringing Krunal Pandya and Deepak Hooda together. pic.twitter.com/umo0bqtfZo
— Shilpak. (@ugach_kahitarii) February 12, 2022
Firstly, Jos Butler and R Ashwin
Now, Deepak Hooda and Krunal Pandya pic.twitter.com/xvVMvmjGjW— Jethiya (@Cricworld73) February 12, 2022
मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत हे दोन्ही खेळाडू बडोदा संघासाठी खेळत होते. पण दोघांमध्ये वाद झाला आणि हुडाने बायो बबलच्या बाहेर जात संघाची साथ सोडली. त्यावेळी बडोदा संघाकडून कृणाल पंड्याला अधिक महत्वा मिळाले होते. नंतर दीपकने असे आरोप केले की, कृणाल संघात मनाचा कारभार करत होता आणि खेळाडूंसोबत गैरवर्तनही करत होता. सोबत त्याने असेही सांगितले की, कृणालने अनेक वेळा त्याच्यासोबत शिवीगाळ देखील केली. बडोदा संघाची साथ सोडल्यानंतर सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीच्या मागच्या हंगामात हुडाने राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच, चांगले प्रदर्शन करून दाखवले. याच जोरावर त्याने काही दिवसांपूर्वी भारतीय संघासाठी पदार्पणही केले.
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडणारा ‘कृष्णा’ लिलावात झाला ‘प्रसिद्ध’, १० कोटी देत ‘या’ संघाने घेतले ताफ्यात
दिनेश कार्तिकसाठी रंगली ‘सदर्न डर्बी’! आरसीबीने लावली मोठी बोली
ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयाचा शिल्पकार मार्श बनला ‘दिल्लीकर’