गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 131 धावांचे लक्ष्य ठेवले. मंगळवारी (2 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या पाच विकेट्स पावरप्लेच्या 6 षटकांमध्येच पडल्या होत्या. सामन्याच्या पहिल्या डावात मोहम्मद शमी हिरो ठरला. शमीने अवघ्या 7 धावा खर्च करून आपल्या तीन षटकांमध्ये चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर शमीची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने आपल्या चार षटकांच्या कोट्यामध्ये एकूण 11 धावा खर्च केल्या आणि चार विकेट्स घेतल्या. आपल्या शेवटच्या षटकात त्याला एकही विकेट मिळाली नाही. चालू आयपीएल हंगामात मोहम्मद शमीने चांगलीच मेहनत घेतली आहे आणि अहमदाबादची खेळपट्टी त्याला चांगल्या पद्धतीने समजली आहे. डावात चार विकेस्ट घेतल्यानंतर शमीने दिल्ली कॅपिटल्सला गुजरातपुढे गुडघे टेकण्यास भाग पाडले. दिल्लीच्या फलंदाजीनंतर शमी माध्यमांसमोर आला तेव्हा, माझे पेट्रोल संपले होते, अशी मिश्किल प्रतिक्रिया शमीने दिली.
“मी माझ्या रणनीतीलनुसार गोलंदाजी करत होतो. माझी जबाबदारी आक्रमक गोलंदाजी करून विरोधी संघाच्या फलंदाजांच्या विकेट्स घेणे आहे. तसोच विरोधी संघाला सुरुवातचे झटके देणे हीदेखील आमची रणनीती आहे. विजयासाठी आमच्यापुढे 131 धावांचे लक्ष्य आहे. मला वाटते आम्ही हे लक्ष्य गाठू. मला असे वाटत नाही की, या खेळपट्टीवर चेंडू स्विंग किंवा सीम होत आहे.” शमीने डावातील सातव्या षटकात आपला चार षटकांचा कोटा संपवला.
शमीची गोलंदाजी संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरली. मात्र त्याला अजून काही षटके टाकण्याची संधी मिळाली असती, तर दिल्लीसाठी 100 धावा करणेही कठीण झाले असते. याच पार्श्वभूमीवर शमीने पत्रकारांनी प्रश्न विचारला. पत्रकाराने असे विचारले की, त्याला अजून गोलंदाजी करायची इच्छा होती का? या यावर शमीने स्पष्ट नकार दिला. शमी म्हणाला, “मला अजून गोलंदाजी करायची नव्हती. माझे पेट्रोल संपले होते.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 130 धावा केल्या. यात अमन खान () याने सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. संघातील दुसरा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. (After bowling strongly, Mohammad Shami said that I had no petrol left)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जे बात! शमीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, दणादण विकेट्स काढत दाखवून दिला दम; Video
‘शुबमन गिल हा फिरकीपटूंविरुद्ध खेळणारा मास्टर’, भारताच्या दिग्गज स्पिनरचे मोठे भाष्य