मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील लढत फारच रोमांचक झाली. मुंबईच्या फलंदाजांनी विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत प्रयत्न केले, पण अर्शदीप सिंग याच्या शेवटच्या षटकात मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. अर्शदीनेप शेवटच्या षटकात लागोपाठ दोन चेंडूवर दोन वेळा फलंदाजांचा त्रिफळा उडवला. असे असले तरी, सामनावीर पुरस्कार मात्र सॅम करन याला मिळाला. विजयानंतर सॅम करनने खास प्रतिक्रिया दिली.
मुंबईला या सामन्यात विजयासाटी 215 धावांचे लक्ष्य मिळाले होते. नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्ज संघ प्रथम फलंदाजीला आला आणि 8 बाद 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने निर्धारित 20 षटकात 6 बाद 201 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा, कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी महत्वाच्या धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. तसेच पंजाब किंग्जने उभी केलेली धावसंख्या कर्णधार सॅम करन (Sam Curran) याच्या आतिशी खेळीच्या जोरावर होऊ शकली. करनने 29 चेंडूत 55 धावा केल्या आणि सामनावीर पुरस्काराचा मानकरी देखील ठरला. करनच्या मते सामनावीर पुरस्कारासाठी त्याच्या आधीत संघातील इतर खेळाडू दावेदार होते.
सामनावीर पुरस्कारासाठी इतर खेळाडूही दावेदार होते – सॅम करन
मुंबई इँडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात 13 धावांनी पराभूत केल्यानंतर पंजाबचे नेतृत्व करणारा सॅम करन माध्यमांशी बोलण्यासाठी आला. यावेळी तो म्हणाला की, “या मैदानावर (वानखडे) खेळणे नेहमीच खास अनुभव राहिला आहे. हा आणच्यासाठी मोठा विजय आहे. संघातील इतर खेळाडूंनी ज्या पद्धतीने अप्रतिम खेळ दाखवला, मला वाटत नाही की सामनावीर पुरस्कार मला मिळाला पाहिजे होता. शिखर धवन संघात नसतानाही खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवला. धवन लवकरच फिट होईल. ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत.”
सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर अर्शदीप सिंग खऱ्या अर्धाने पंजाबला मिळालेल्या विजयाचा शिल्पकार ठरल. अर्शदीपने टाकलेल्या चार षटकात 29 धावा खर्च करत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मुंबईसाठी सूर्यकुमार (57) आणि कॅमरून ग्रीन (67) यांनी अर्धशतके केली. (After defeating Mumbai, Sam Curran made a special comment about the man of the match award)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन स्टंप मोडत मुंबईला वानखेडेत लोळवल्यानंतर अर्शदीपचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझ्या हृदयाची धडधड…’
‘कारवाई तर होणारच…’, अर्शदीपने स्टंप तोडल्यावर पंजाब किंग्जच्या ट्विटवर मुंबई पोलिसांचे भन्नाट उत्तर