वनडे विश्वचषक 2023 अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शुक्रवारी (29 सप्टेंबर) विश्वचषकासाटी सामन्यांना सुरुवात झाली. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या विश्चषकासाठी जवळपास सर्व संघ भारतात दाखल झाले. इंग्लंड संघ देखील गुरुवारी (28 सप्टेंबर) भारतात दाखल झाला. पण प्रवासात इंग्लिश खेळाडू पुरते वैतागल्याचे दिसते. जॉनी बेअरस्टो याने इंस्टाग्राम स्टोरिच्या माध्यामातून ही नाराजी व्यक्त केली.
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) हंगाम 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. पण त्याआधी शुक्रवारी (29 सप्टेंबर) विश्वचषकाचे सराव सामने सुरू झाले. इंग्लंडला आपला पहिला सराव सामना यजमान भारताविरुद्ध शनिवारी (30 सप्टेंबर) खेळायचा आहे. गुवाहाटी याठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सराव सामना खेळवला जाणार आहे, ज्यासाठी इंग्लंड संघ गुवाहाटीमध्ये पोहोचला देखील आहे. पण गुवाहाटीला पोहोचताना प्रवासात इंग्लंड संघाला चांगलाच त्रास झाल्याचे दिसते. संघ 38 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवासात होता. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरी शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली.
बेयरस्टोच्या मते 38 तासांपेक्षा जास्त वेळा झालेला प्रवास खूपच त्रासदायक होता. एवढा वेळ होऊन देखील इंग्लंड संघ विमानातच असल्याचे या स्टोरिमध्ये पाहायला मिळते. दरम्यान, वनडे विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. हे दोन संघ 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने सामने होते.
दरम्यान, वनडे विश्वचषक यावर्षी भारतातील 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केला गेला आहे. इंग्लंड संघ आपले आठही सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळणार आहे. संघाला लखनऊ, धर्मशाला, दिल्ली, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, पुणे आणि कोलकाता याठिकाणी सामने खेळायचे आहेत. अशात खेळाडूंना चांगलाच प्रवास करावा लागणार, यात कुठलीच शंका नाही. (After entering India, Jonny Bairstow expressed his displeasure through Instagram story.)
महत्वाच्य बातम्या –
वर्ल्डकपआधी दुखापतींचे सत्र सुरूच! विलियम्सनपाठोपाठ ‘या’ संघाचाही कर्णधार जायबंदी
BREAKING: विश्वचषकाच्या सुरुवातीआधीच न्यूझीलंड संघाला धक्का, कॅप्टन केन दुखापतीमुळे बाहेर