भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळाडूंनी झटपट विकेट्स गमावल्या. यादरम्यान, श्रीलंका संघाच्या चौथ्या विकेटच्या रूपात उपकर्णधार धनंजया डी सिल्वा तंबूत परतला. डी सिल्वाला पंचांनी नाबाद करार दिली होता, पण रिषभ पंत याच्या सांगण्यावरून रोहित शर्माने डीआरएस घेतला आणि संघाला ही विकेट मिळाली.
धनंजया डी सिल्वा (Dhananjaya de Silva) १० धावा करून तंबूत परतला. पंचांनी डी सिल्वाला नाबाद करार दिला होता आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रिव्ह्यू घ्यावा की, नाही या संभ्रमात होता. अशात यष्टीरक्षक फलंदा रिषभ पंतने आग्रह केल्यामुळे रोहितने डीआरएस घेतला आणि संघाला ही विकेट मिळाली. त्यावेळी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) होता.
शमीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपजवळ पडल्यानंतर वेगत आतल्या बाजून बळला होता. रिप्लेमध्ये दिसले की, चेंडू बॅटला न लागता मधल्या आणि लेग स्टंपच्या टॉपवर लागला होता. पंतने दिलेला सल्ला भारतीय संघाच्या कामी आला आणि पंचांना डी सिल्वाला बाद घोषित केले.
धनंजया डी सिल्वाची विकेट मिळाल्यानंतर भारतीय संघ जल्लोष करत होता. यादरम्यान संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या डोक्यावर तबला वाजवताना दिसला. अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही त्याचा हा अंदाज आवडला आहे.
— Akhil Gupta 🏏 (@Guptastats92) March 12, 2022
https://twitter.com/rohan_gulaty/status/1502677648421507078
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि २५२ धावांवर भारताचा पहिला डाव गुंडाळला गेला. त्यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ विकेट्सच्या नुकसानावर ८६ धावा केल्या. एकंदरित पाहता पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी मैदानात तब्बत १६ विकेट्स पडल्या. श्रीलंका संघासाठी लसिथ एम्बुलडेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर भारासाठी पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने २ आणि अक्षर पटेलने १ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्ये २ कर्णधार विदेशी, तर ८ संघांच्या नेतृत्वाची कमान भारतीय खेळाडूंकडे; पाहा यादी
आरसीबी संघाचा कर्णधार झाल्यानंतरही फाफ डू प्लेसिसला आहे ‘या’ गोष्टीचा पश्चाताप, वाचा काय म्हणाला