---Advertisement---

सामन्यात पाकिस्तान गोलंदाजांचे कमबॅक! शतकी भागीदारीनंतर रोहित-गिल तंबूत

On: रविवार, सप्टेंबर 10, 2023 4:38 PM
Sheheen Afridi Rohit Sharma Shubman Gill
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकले. पण भारताच्या डावातील 17व्या षटकात कर्णधार रोहित झेलबाद झाला. तसेच सलामीवीर शुबमन गिल याने पुढच्याच म्हणजे 18व्या षटकात विकेट गमावली. संघाला जोरदार सुरुवात दिल्यानंतर या दोघांनी विकेट गमावल्या. भारतीय संघासाठी या महत्वाच्या सामन्यात रोहित आणि गिलने एक भक्कम पाया रचला.

फहिम अश्रफ (Fahim Ashraf) याने रोहित शर्मा (rohit sharma) याचा झेल घेतला असून यावेळी शादाब खान (Shadab Khan) गोलंदाजी करत होता. 17व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहितच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्याच षटकात शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) गोलंदाजीला आला आणि षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने शुबमन गिल (Shubman Gill) याला तंबूचा रस्ता दाखवला. गिलने शादाब खान याच्या हातात झेल दिला. गिलने 52 चेंडूत 58 धावांची खेळी केली, तर रोहितने 49 चेंडूत 56 धावा कुटल्या.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी (10 सप्टेंबर) कोलंबोमध्ये खेळला जात आहे. आशिया चषक 2023 मध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधीला हा दुसरा सामना आहे. भारतने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. कर्धणार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये संघाची धावसंख्या बिनबाद 61 धावा होती. (After giving the team a good start, Rohit Sharma and Shubman Gill lost wickets)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
नाद करा पण आमचा कुठं! टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, रोहित अन् गिलचे झंझावाती अर्धशतक
 रोहितने चार वर्षांनंतर करून दाखवला ‘हा’ पराक्रम, शाहीन आफ्रिदीला दिला चोप; वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---