ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलनंतर आणखी एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू निक मॅडिसनने मानसिक त्रासामुळे क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचा 11 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या दिवस-रात्र सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघात समावेश करण्यात आला होता. मात्र या सामन्याआधीच मानसिक आरोग्य ठिक नसल्याने मॅडिसनने हा सामना खेळण्यास नकार दिला आहे.
शनिवारी ऑस्ट्रेलिया अ संघाचे प्रशिक्षक ग्रॅमी हिक यांनी याबाबत माहिती दिली. मॅडिसनने शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याबाबत लेखी माहिती दिली होती.
मॅडिसनने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याला मानसिक आजाराला सामोरे जावे लागले. या कारणास्तव तो संघातून बाहेर पडला .
2017 च्या सुरूवातीस, त्याने मानसिक आजारामुळेच विश्रांती घेतली होती. 2018 मध्ये त्याने पुनरागमन केले. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याची ऑस्ट्रेलियन अ संघात निवड झाली. मात्र पुन्हा एकदा त्याला मानसिक त्रास होत असल्याने त्याने काही काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘निकने योग्य निर्णय घेतला आहे आणि आम्ही सर्व त्याच्या पाठिशी आहोत. मौन पाळून त्रास सहन करण्यापेक्षा त्याबद्दल बोलणे चांगले आहे. मी निकने प्रथम आरोग्याला प्राधान्य देण्याच्या धाडसाचे कौतुक करत’, असे हिक म्हणाले.
निकच्या जागी आता कॅमेरॉन बेनक्राॅफ्टची ऑस्ट्रेलियाच्या अ संघात निवड झाली आहे. तो सोमवारी सुरू होणार्या सराव सामन्यात खेळेल, असे ऑस्ट्रेलिया अ संघाचे प्रशिक्षक हिक म्हणाले.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघात फील्डिंग कोच मोहम्मद कैफने या खेळाडूचे केले खास स्वागत!
वाचा👉https://t.co/ELa2JJIVTj👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019
बांगलादेश विरुद्ध श्रेयस अय्यर ठरला हिटमॅन रोहित शर्मापेक्षा भारी!
वाचा👉https://t.co/3KWKGFkFJ8👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #ShreyasIyer— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019