आशिया चषक सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंना दुखापत होण्याचे सत्र सुरू झाले आहे. सुरुवातीला जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल बाहेर गेल्याने भारताला दोन झटके मिळाले. त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाल्याने पाकिस्तानी संघाची डोकेदुखी वाढली. आणि आता हे सत्र बांग्लादेश संघाच्या गोटात जाऊंन पोहोचले आहे.
संघाचा सलामीवीर लिटन दास आधीच आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर नुरुल हसनलाही दुखापत झाली आहे. आता २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीत असलेल्या बांगलादेश संघाला आणखी दोन धक्के बसले आहेत. हसन महमूद आणि महेदी हसनही सरावाच्या वेळी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू मॅच विनर’, आशिया चषकातून बाहेर झालेल्या आफ्रिदीचा सूचक इशारा
तो इलेव्हनमध्ये आला, तर समझा पाकिस्तानचा गेमच झाला! ‘हा’ आहे एशिया कपमधील भारताचा लकी चार्म