आयपीएल 2024 मध्ये कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) ट्रॉफी जिंकली होती, पण त्याला त्याचे श्रेय देण्यात आले नाही. आता अशीच परिस्थिती आयपीएल 2025 मध्ये सुद्धा दिसून आली. जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारला ट्रॉफी जिंकल्यावर त्याचे श्रेय देण्यात आलेले नाही. आरसीबीचे मार्गदर्शक दिनेश कार्तिकने (Dinesh karthik) आता कर्णधाराला दुर्लक्षित केले आहे आणि विजयाचे सर्व श्रेय या सुपरस्टार खेळाडूला दिलेले आहे. ज्याच्यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Royal Challengers Bangaluru) माजी खेळाडू आणि मार्गदर्शक दिनेश कार्तिकने आयपीएल 2025 जिंकल्यानंतर मोठ्या काळानंतर क्रिकबज वर बोलताना सर्व क्रेडिट या खेळाडूला देत म्हटले की, आरसीबी 2025 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकण्यामागे विराट कोहली मुख्य व्यक्ती आहे. तसेच या हंगामात रजत पाटीदारने शानदार कर्णधार पद भूषवले आणि त्याच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने (Jitesh Sharma) देखील मोठी भूमिका निभावली. 2008 पासून विराट कोहली (Virat Kohli) आरसीबी संघाचा भाग आहे तसेच 2012 पासून 2022 पर्यंत तो आरसीबीचा कर्णधार राहिलेला आहे. परंतु त्यावेळी आरसीबी (RCB) फक्त एकदा फायनलमध्ये पोहोचली होती.
कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या हंगामात पाटीदारने आरसीबीला ट्रॉफी मिळवून दिली. त्यानंतर सुद्धा पाटीदारची चर्चा होत नाही. फलंदाज म्हणून त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली होती. 2025 मध्ये विराट कोहलीने देखील सर्वांना प्रभावित केले, आरसीबीच्या जास्त सामन्यात कोहलीने जास्त चांगली धावसंख्या केली, तसेच आता ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार पाटीदारचा सन्मान भारतीय क्रिकेटमध्ये वाढलेला आहे.






