भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने बुधवारी (1 मार्च) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 विकेट्स पूर्ण केल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर बुधवारी सुरू झाला. पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का दिला. सलामीवीर ट्रेविस हेड याची विकेट घेतल्यानंतर जडेजाने रविंद्र जडेजा कपिल देवनंतर दुसरा असा अष्टपैलू ठरला, ज्याने भारतासाठी खास विक्रम केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोर कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघ 109 धावांवर गुंडाळला गेला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे महत्वाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील फलंदाजीमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पण गोलंदाजीची वेळ आल्यानंतर जडेजानेत भारताला पहिले यश मिळवून दिले. डेविड वॉर्नर दुखापतीमुळे मायेदशात परतला असताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी केली. उस्मान ख्वाजा संयमी खेळी करत राहिला, पण ट्रेविस हेड मात्र अवघ्या 9 धावांवर विकेट गमावून बसला. फिरकीपटू जडेजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही 500वी विकेट असून त्याने खास विक्रम नावावर केला.
जडेजा भारतीय संघाचा दुसरा असा अष्टपैलू ठरला, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 500विकेट्स पूर्ण केल्या. यापूर्वी अशी कामगिरी भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी केली होती. जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5527 धावा केल्या आहेत आणि बुधवारी स्वतःच्या 500 विकेट्सही पूर्ण केल्या. दुसरीकडे कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 9031 धावा केल्या आणि 657 विकेट्स घेतल्या होत्या. जडेजा कपिल देवनंतर 5000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरला असला, तरी कपिल देवपेक्षा जडेजा अजून खूपच मागे आहे. असात कपिलला मागे टाकण्यासाठी जडेजाला अजून बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे चांगले प्रदर्शन टिकवून ठेवावे लागेल.
भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000+ धावा आणि 500+ विकेट्स गेणारे गोलंदाज
कपिल देव – 9031 धावा आणि 687 विकेट्स
रविंद्र जडेजा – 5527 धावा आणि 500* विकेट्स
(After Kapil Dev, Ravindra Jadeja has become the second Indian bowler to achieve such feat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलला संघातून वगळल्यानंतर वेंकटेश प्रसाद चर्चेत, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने उडवली भारतीय संघाची दाणादाण, फक्त ‘एवढ्या’ धावांवर खेळ खल्लास