ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. पहिल्या दोन सामन्याप्रमाणे तिसऱ्या कसोटीतही खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल होती, ज्यावर भारतीय फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे भारताने अवघ्या 109 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या.
A huge bowling effort from Australia means that India all out for 109!#INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 1, 2023
ऑस्ट्रेलियाला या तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगली सुरुवात देण्यासाठी त्यांचा फिरकीपटू मॅथ्यू कुह्नेमन (Matthew Kuhnemann) याचे प्रदर्शन सर्वात महत्वाचे ठरले. कुह्नेमनने सामन्याच्या पहिल्या डावात 9 षटकात 16 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे भारतीय संघासाठी विराट कोहली (Virat kohli) याने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. पहिल्या डावात भारताचा एकही फलंदाज 22 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने एकही चूक न करता सामन्यात भक्कम स्थिती प्राप्त केली. कह्नेमनप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नाथन लायन याने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, उभय संघांतील या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा एंकदरीत विचार केला, तर भारतीय संघ 2-0 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव 132 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने भारताला विजय मिळाला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मात्र भारतीय संघ पहिल्याच दिवशी मागे पडल्याचे दिसत आहे. पहिल्या डावाती संघाचे प्रदर्शन पाहता विजय सोपा दिसत नाहीये. उभय संघांतील या सामन्यात भारताच्या केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली गेली आहे. राहुलच्या जागी शुबमन गिल, तर शमीच्या जागी उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आहे.
(In the first innings of the third Test, the Indian team was all out at just 109 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुल अखेर बाहेर, संघ व्यवस्थापनाला का घ्यावा लागला निर्णय?
नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, केएल राहुल आणि ‘हा’ प्रमुख खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर