सध्या भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली आहे. तसेच आणखी मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिल्याने संघ हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणार आहे. राहुल द्रविड याने ब्रेक घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या मदतीला आर अश्विन बरोबरच दिनेश कार्तिक यानेही धाव घेतली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी माझा विश्रांतीवर विश्वास नाही, असे विधान न्यूझीलंड विरुद्धची मालिका सुरू होण्याआधी केली. मला संघाला समजून घ्यायचे आहे. जेव्हा तुम्हाला आयपीएलच्यावेळी 2-3 महिन्यांचा ब्रेक मिळतो तर अतिरिक्त विश्रांतीची काय आवश्यकता.
शास्त्रींच्या वक्तव्यावर आता दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने द्रविडची बाजू घेत स्पष्टीकरण दिले आहे. कार्तिक म्हणाला, “30 तारखेला संघ बांगलादेशला जाणार आहे आणि न्यूझीलंडचा दौरा 30च्या आत संपणार नाही. यामुळे ते एकाचवेळी दोन्ही ठिकाणी असू शकत नाही. यावरून काय समजायचे ते समजू शकता.”
“माझ्या मते 2023 च्या वनडे विश्वचषकानंतर अनेक प्रशिक्षकांच्या करारांचे नूतनीकरण होण्याची शक्यता असल्याने त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मला वाटते की स्प्लिट कोचिंग, ज्याची शक्यता असून आवश्यकताही आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटला आणखी महत्व प्राप्त होत आहे, याचा अर्थ दर दोन वर्षांनी तुमच्याकडे खेळण्यासाठी काहीतरी आहे. त्यामुळे तुमच्याकडे कसोटी क्रिकेट खेळणारे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे दोन्ही फॉरमॅट खेळणारे खेळाडू असतील, पण तुम्हाला बरेच कसोटी खेळाडू त्याचा भाग नसताना दिसतील. अशावेळी खेळाडू वेगवेगळे असले तर वेगवेगळे प्रशिक्षक असण्यास काही हरकत नाही,” असेही कार्तिकने पुढे म्हटले.
कार्तिकच्या आधी अश्विननेदेखील द्रविड यांची बाजू घेतली होती. त्याने म्हटले, टी20 विश्वचषकाचे आयोजन करताना प्रशिक्षकांनी किती मेहनत घेतली हे मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे खेळाडूंबरोबर त्यांनाही विश्रांतीची गरज आहे.
न्यूझीलंडच्या दौऱ्यात विराट, रोहित बरोबर अश्विन, कार्तिक, मोहम्मद शमी, केएल राहुल इत्यांदीना वगळले आहे. After Ravi Ashwin, Dinesh Karthik also took Rahul Dravid’s side; Said, ‘After the 2023 ODI World Cup, I….’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट इतिहासातील ‘तीन दिग्गज’; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली
मोठी बातमी! फिफा विश्वचषकाच्या 44 वर्षात पहिल्यांदाच ‘अशी’ अप्रिय घटना, सर्वोत्तम खेळाडू बाहेर