बुधवारी (५ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेतील ५२ वा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु शेवटच्या क्षणी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ४ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला गुणतालिकेत मोठा तोटा झाला, तर टॉप-२ मधील संघाचा फायदा झाला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाला प्लेऑफच्या सामन्यांमध्ये मोठा फायदा असतो. कारण क्वालिफायरच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर त्या संघाला एलिमिनेटरच्या सामन्यात अंतिम फेरी गाठण्याची पुन्हा एकदा संधी मिळत असते. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ १८ गुणांसह दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. जर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात या संघाला विजय मिळवण्यात यश आले असते, तर हा संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला असता.
पण आता हे सर्व समीकरण पाहता आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात आमने सामने येणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळेल. जो संघ क्वालिफायर २ मध्ये विजय मिळवणार तो संघ आणि क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला संघ, अंतिम फेरी गाठण्यासाठी एलिमिनेटरच्या सामन्यात एकत्र येणार. या सामन्यात जो विजय मिळवणार तो संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल.
पराभव झाल्यानंतर विराट कोहलीच्या चिंतेत वाढ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सनराझर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकत टॉप-२ स्थानी पोहवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे त्यांचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एकच सामना शिल्लक राहिला आहे.
तसेच गुरुवारी (७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. जर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ पराभूत झाला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला, तरीदेखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला टॉप २ मध्ये प्रवेश करता येणार नाही. कारण चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांचे गुण समान होऊन जातील. नेट रन रेटचा बाबतीत चेन्नई सुपर किंग्स संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघापेक्षा खूप पुढे आहे. याचा फायदा चेन्नई सुपर किंग्जला होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
सागरिका घाटगेबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल ७ वर्षे होते प्रेमसंबंध
कौतुकाची थाप तर हवीच! विलियम्सनने बेंगलोरविरुद्धच्या ‘रॉयल’ विजयाचे श्रेय दिले ‘या’ भारतीयाला