---Advertisement---

निवृत्तीनंतर 2 महान दिग्गजांचा फोन आल्यावर काय म्हणाला अश्विन? “मला हृदयविकाराचा झटका…”

On: शुक्रवार, डिसेंबर 20, 2024 2:09 PM
Ravichandran Ashwin
---Advertisement---

‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियातील ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या कसोटीनंतर लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच दिवशी (18 डिसेंबर) त्याला भारतीय क्रिकेटच्या 2 महान दिग्गजांचा फोन आला, ज्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या कॉल लॉगचा स्क्रीन शॉट शेअर करताना तो म्हणाला की, 25 वर्षांपूर्वी जर कोणी मला भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी या 2 महान क्रिकेटपटूंचा फोन येईल असे सांगितले असते तर मला हृदयविकाराचा झटका आला असता.

‘आर अश्विन’ने (R Ashwin) एक्सवर एक स्क्रीनशाॅट शेअर करत लिहिले की, “जर कोणी मला 25 वर्षांपूर्वी सांगितले असते की, माझ्याकडे एक स्मार्ट फोन असेल आणि भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसाचा कॉल लॉग असा असेल, तेव्हा मला हृदयविकाराचा झटका आला असता. सचिन सर आणि कपिल देव पाजी यांचे आभार.”

स्क्रीनशॉटमध्ये, भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी अश्विनला व्हॉट्सअप कॉल केला आहे, तर महान फलंदाज ‘सचिन तेंडुलकर’ने (Sachin Tendulkar) त्याला फेसटाइम ऑडिओ कॉल केला होता.

अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट होती. त्याने आपल्या कारकिर्दीत असे काही रेकाॅर्ड केले, ज्यामुळे त्याच्या यशस्वी कारकिर्दीत भर पडली. तो अनिल कुंबळे (Anil Kumble) (619) नंतर भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने 106 कसोटी सामन्यात एकूण 537 विकेट्स घेतल्या. या दिग्गज खेळाडूने 116 वनडे सामन्यात 156 विकेट्स आणि 65 टी20 सामन्यात 72 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने केवळ गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही अप्रतिम खेळी केली. विशेषतः त्याच्या नावावर 6 शतकांसह 3,503 कसोटी धावा आहेत. वनडेमध्ये 707 आणि टी20 मध्ये 184 धावा त्याने केल्या आहेत. अश्विनच्या नावावर कसोटीत 37 वेळा 5 विकेट्सचा रेकाॅर्ड आहे, जो भारतीय गोलंदाजाचा सर्वोत्कृष्ट रेकाॅर्ड आहे.

बांग्लादेशने रचला इतिहास, टी20 मध्ये वेस्ट इंडिजचा प्रथमच व्हाईटवॉश
“जसप्रीत बुमराह वसीम अक्रमसारखा…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
यंदाच्या वर्षी ‘या’ 3 खेळाडूंनी वनडेमध्ये भारतासाठी केल्या सर्वाधिक धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---