भारतीय संघाचा स्ट्रार फलंदाज शिखर धवन याला एका प्रसंगानंतर एचआव्ही चाचणी करावी लागली होती. धवनने स्वतः याविषयी खुलासा केला. धवनने सांगितले की एकदा मनाली ट्रिपनंतर तो खूप घाबरला होता आणि त्यामुळेच एचआयव्ही चाचणीही केली होती. त्यांनी ही चाचणी करण्यामागचे कारण देखील सांगितले.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. याच मुलाखतीदरम्यान धवनने एकदा एचआयव्ही (HIV) चाचणी केल्याचेही सांगितले. धवनच्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढलेले आहेत. त्याला पहिल्यापासूनच शरीरावर टॅटू काढण्याची आवड राहिली आहे. पण एकदा हीच आवड धवनसाठी डोकेदुखी बनली होती. वयाच्या 14-15व्या वर्षी घरच्यांना न कळवता पाठीवर टॅटू काढल्याची माहिती धवनने या मुलाखतीत दिली.
शिखर धवन वयाच्या 14-15व्या वर्षी मनालीला ट्रिपसाठी गेला होता. या ट्रिपमध्ये त्याने घरी न सांगता आपल्या पाठीवर टॅटू काढला. पुढचे 3-4 महिने त्याच्या घरी या टॅटूविषयी कुठलीच कल्पना नव्हती. पण एकदा त्याच्या वडिलांना या टॅटूविषयी खबर लागली. यानंतर धवनने वडिलांचा चांगलाच मार खाल्ला. धवनने सांगितल्यानुसार या प्रसंगानंतर तो खूप घाबरला होता. कारण त्याला जराही कल्पना नव्हती की, एका सुईने किती लोकांच्या अंगावर टॅटू काढला जातो. याच कारणास्तव त्याने एचआयव्ही चाचणी केली, जी निगेटिव्ह आली होती.
धवने त्यावेळी पाठीवर काढलेला हा टॅटू एका स्कॉर्पिओचा होता. सध्या त्याच्या शरीरावर एकापेक्षा एक टॅटू पाहायला मिळतात. यामध्ये शंकर आणि अर्जुनाचा टॅटू देखील आहे. अर्जुन जगातील सर्वोत्तम तिरंदाज होता, असे धवन म्हणाला आणि त्यामुळेच आपल्या शरीरावर त्याने हा टॅटू काढल्याचे सांगितले. धवन या मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यावर देखील बोलला. सप्टेंबर 2021 मध्ये आणि आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला. याविषयी देखील धवनने सविस्तर प्रतिक्रिया दिली.
(After returning from Manali trip, Shikhar Dhawan had to undergo an HIV test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी फलंदाज सूर्याच्या एक पाऊल पुढे! सलग 4 सामन्यात खोलले नाही खाते, तीन वर्षापासून…
बीसीसीआयकडून आयपीएल फ्रॅंचाईजींना तंबी! खेळाडूंच्या दुखापतींबाबत ‘नो कॉम्प्रमाईज’, रोहित-हार्दिक मानणार का?






