सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांचे संबंधी अगदी मैत्रीपूर्ण आहेत. मंगळवारी रोहितने जवळफास तीन वर्षांनंतर वनडे शतक ठोकले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मंगळवारी (24 जानेवारी) इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळला गेला. रोहित शर्मा याने शतक केल्यानंतर सूर्यकुमार खूपच खुश झाला. पण रोहितच्या शतकावर सूर्यकुमारचे समाधान नव्हते.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने न्यूझीलंडविरुद्धच्या या शेवटच्या वनडे सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचे गोलंदाज रोहित आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांचे वादळ रोखू शकले नाहीत. रोहितने 85, तर शुबमनने 72 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. शतकीय खेळीनंतर रोहित आणि गिल स्वतःचा डाव पुढेही काही वेळ असाच सुरू ठेवतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, रोहितने विकेट गमावली आणि संघाला एकप्रकारे गळती लागली. डावातील 27 व्या षटकात रोहितच्या रूपात मायकल ब्रेसवेल याने न्यूझीलंडला पहिली विकेट मिळवून दिली. रोहितने 101 धावा करून विकेट गमावली. तरत शुबमन गिल 103 धावा करू शकला.
रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून वनडे शतक करू शकला नसल्यामुळे मंगळवारच्या शतकाचे मोल अधिकच वाढले. शतक पूर्ण झाल्यानंतर रोहितसह संपूर्ण भारतीय संघ आनंदात होता. अशातच सूर्यकुमार यादव () याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादव () या व्हिडिओत रोहितला काहीतरी खुनवण्याचा प्रयत्न करत आहे. 26 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली आणि स्वतःचे शतक पूर्ण केले. वनडे कारकिर्दीतील हे रोहितचे 30 वे शतक होते. या कामगिरीनंतर संघातील इतर खेळाडूंप्रमाणे सूर्यकुमारही रोहितला प्रोस्ताहन देताना दिसला. यावेळी त्याने आपल्या दोन्ही हातांचे एक-एक बोट वर करून सांगण्याचा प्रयत्न केला की, त्याला रोहितकडून द्विशतकाची अपेक्षा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
After completing century, Suryakumar Yadav was asking for double century from Rohit Sharma. What a great bond of Ro 💙 and Surya dada 😭🙏. https://t.co/AKdhV0XGQ7
— Vishal. (@SPORTYVISHAL) January 24, 2023
The Moment when Rohit Sharma completed his century after 1000 days🥺🥺#RohitSharma #INDvNZ #NZvIND #INDvsNZ #NZvsIND #ViratKohli #ShubhmanGill pic.twitter.com/WpBg4EJQmi
— Cric18 (@Criclav_18) January 24, 2023
दरम्यान, रोहित आणि शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात 9 बाद 395 धावा केल्या. या सामन्यातील शतकापूर्वी रोहितने जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे शतक ठोकले होते. दरम्यानच्या काळात रोहितने अनेकदा महत्वपूर्ण खेळी केल्या, पण शतक मात्र करू शकला नाही. मंगळवारी अखेर त्याचा शतकांचा दुष्काळ संपला. गिलसोबत मिळून त्याने पहिल्या विकेटसाठी 212 धावांची खेळी केली. (After Rohit Sharma completed his century, Suryakumar asked him for a double century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडिया फोडणारच! नव्या वर्षातील ही तुफानी आकडेवारी समोर, तीन प्रतिस्पर्धी नामोहरम
सचिन आणि गांगुलीच्या यादीत युवा शुबमन गिलला मिळाली संधी, रोहितच्या साथीने केली मोठी भागीदारी