भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना किंग्समीड, डर्बन या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 61 धावांनी शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) शानदार शतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीनंतर त्याने 5 रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.
1) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक- संजू सॅमसनने (Sanju Samson) अवघ्या 50 चेंडूत 107 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 10 गगनचुंबी षटकार ठोकले. यासह सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी20 मध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
2) आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद शतक- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसनने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावले. यासह तो दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
3) टी20च्या एका डावात सर्वाधिक षटकार- सॅमसनने आपल्या तुफानी खेळीत एकूण 10 षटकार ठोकले. यासह, तो टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संयुक्तपणे सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी भारताकडून फक्त रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 सामन्याच्या एका डावात 10 षटकार मारले होते.
4) टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा- सॅमसन आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने डेव्हिड मिलरचा (David Miller) रेकाॅर्ड मोडला आहे.
5) सलग 2 शतके झळकावणारा पहिला भारतीय- दक्षिण आफ्रिकेविरूद्ध धमाकेदार खेळी करत संजू सॅमसनने एक मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. सॅमसन आता सलग 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावणारा पहिला भारतीय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत-पाकिस्तान आमने-सामने! ‘या’ दिवशी होणार लढत
IND vs SA; शानदार विजयानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्हाला कोणत्याही…”
IND vs SA; शानदार शतकानंतर संजू सॅमसनने मोठे वक्तव्य करत जिंकली चाहत्यांची मनं!