आयपीएल २०२२ च्या ९ व्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी (MI vs RR) भिडला. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा होता, कारण त्यांनी या हंगामातील पहिल्या सामन्यात अपेक्षित प्रदर्शन केले नव्हते आणि परिणामी त्यांना पराभव स्विकाराला लागला होता. तर दुसरीकडे राजस्थान त्यांचा विजयीरथ पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटरलने या सामन्यात शतकी खेळी केली आणि मुंबईचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जबरदस्त यॉर्करवर त्रिफळाचीत झाला.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indian’s) संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने मर्यादित २० षटाकंमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. या धावसंख्येत त्यांचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने १०० धावांचे महत्वाचे योगदान दिले. बटलर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची भलतीच धुलाई करत होता, पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला डावाच्या १९ व्या षटकात खतरनाक यॉर्कर टाकून त्रिफळाचीत केले.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने राजस्थानच्या तीन महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या. डावाच्या १९ व्या षटकात बुमराह त्याचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात बुमराहच्या गळाला दोन मोठे मासे लागले. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) ३५ धावा करून बाद झाला. तर षटकातील ५ व्या चेंडूवर जोस बटलर बरोबर १०० धावा करून बाद झाला.
बटलरला तंबूत धाडण्यासाठी बुमराहने तो ज्यासाठी ओळखला जातो, तो जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकला. त्याने बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यासाठी सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याचा विकेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
https://twitter.com/sam1998011/status/1510221601861636099?s=20&t=v-bXPv9KUF3YQKvm2JT5tQ
https://twitter.com/MIHIRBORNGENIUS/status/1510221572321472512?s=20&t=KKqixzoHok-NA-PPuO1ASg
Bumrah is unreal man, took Hetmyer & Buttler's wicket when they were smashing other bowlers for fun! pic.twitter.com/fl17T96XKI
— Ana de Armas stan (@abhithecomic) April 2, 2022
दरम्यान, जोस बटरलचे हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे शतक ठरले. बटलरने मुंबईविरुद्धच्या या सामन्यात ६८ चेंडू खेळले आणि १०० धावा केल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तसेच कायरन पोलार्डने एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
IPL2022 | जोस बटलर ठरला आयपीएलच्या १५व्या हंगामात शतक झळकावणारा पहिला फलंदाज
अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या पांडे हिला दुहेरी मुकुट
शाहरुख खान बाद होताच केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरचे ‘किंग खान’ स्टाईल सेलिब्रेशन; Video व्हायरल






