fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

फेब्रुवारीत मुंबईत होणार तिसऱ्या कबड्डी फेडेरेशन कपचा थरार

मुंबई । कबड्डी या खेळाला सध्या चांगले दिवस आले आहेत. हा खेळ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रो कबड्डी, एशियन चॅम्पियनशिप आणि ह्याच महिन्यात झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या पाठोपाठ आता कबड्डी प्रेमी वाट पाहत आहे ते मुंबई नगरीत होणाऱ्या तिसऱ्या फेडेरेशन कपची.

ही स्पर्धा मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन आयोजित करत असून ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या काळात ही स्पर्धा होणार आहे. एसआरपीएफ क्रीडांगण, जयकोच, पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

उपलब्ध माहितीप्रमाणे या स्पर्धेचे प्रथम १९८२ मध्ये प्रथम आयोजन झाले होते तर २०१७मध्ये इंदोर शहरात ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत खेळलेले महिला आणि पुरुष गटाचे संघ भाग घेणार आहे.

दोन्ही गटाचे मिळून एकूण १६ संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यामुळे एकप्रकारे कबड्डीमधील भारतातील दिग्गज संघ या स्पर्धेत भाग घेताना दिसतील.

ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक हे मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन असून या संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार गजानन कीर्तिकर स्वतः या स्पर्धेच्या आयोजनावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

त्यांनी ७ जानेवारी रोजी मैदानाची पाहणी केली असून काल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्मानीय अध्यक्ष किशोर पाटील आणि सरकार्यवाह आस्वाद पाटील यांच्याशी चर्चा केली.

कीर्तिकर हे स्वतः एक मोठे कबड्डीप्रेमी असल्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ते आयोजनात लक्ष देत आहे.

You might also like