गौतम गंभीर इंडियन प्रीमियर लीगमधील तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एमएस धोनी आणि रोहित शर्मा आपल्या आयपीएल फ्रँचायझीला प्रत्येकी पाच-पाच आयपीएल ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत. तर गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ 2012 आणि 2014 साली आयपीएल चॅम्पियन बनला. मागच्या वर्षी गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. पण आगामी आयपीएल हंगामात त्याने पुन्हा एकदा केकेआरचा हात हातात घेतला आहे. यासाठी शाहरुख खान याला माजी भारतीय क्रिकेटपटूला मोठा आर्थिक प्रस्ताव दिला, असे बोलले जात आहे.
गौतम गंभीर () निर्विवादपणे कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. केकेआरने जिंकलेल्या दोन आयपीएल ट्रॉफी गंभीरच्याच नेतृत्वात जिंकल्या आहेत. गंभीरने 2011 मध्ये केकेआरचे कर्णधारपद सांभाळले होते. पुढच्याच वर्षी त्याने संघाला चॅम्पियन बनवले. 2014 मध्येही त्याच्या नेतृत्वात सीएसकेने आपली दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली. 2017 नंतर गंभीरने केकेआरची साथ सोडली आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला. दिल्लीकडून एक आयपीएल हंगाम खेळल्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली.
निवृत्तीनंतर त्याने राजकारणात प्रवेश केला आणि दिल्लीतून भाजपचा खासदार देखील झाला. मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी मेंटॉरची भूमिका पार पाडली. पण आयपीएल 2024 मध्ये तो आपला मुळ संघ म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्ससाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. माहितीनुसार पुन्हा केकेआरमध्ये सामील होण्यासाठी फ्रँचायझीचा मालक शाहरुख खान याने गंभीरला ‘कोरा चेक’ दिला होता. या कोऱ्या चेकवर गंभीर हवी तितकी रक्कम टाकून केकेआरचा सपोर्ट स्टाफचा भाग बनू शकत होता. पण त्याने हा प्रस्ताव स्वीकारला की नाही, याविषयी कुठलीच ठोस माहिती अद्याप मिळाली नाहीये.
दरम्यान, गंभीरने शाहरुखकडून मिळालेल्या कोरा चेक स्वीकारला की नाही, हे अद्याप समोर आले नाहीये. पण चाहते गंभीर पुन्हा केकेआरच्या जर्सीत दिसणार, यामुळेच आनंदी आहेत. (After Shahrukh Khan offered a blank cheque, Gautam Gambhir came back with KKR)
महत्वाच्या बातम्या –
Sarfaraz Khan । 6 लाखाचे डायरेक्ट 15 लाख! भारतासाठी पदार्पण केल्यानंतर सोशल मीडियावर सरफराजची हवा
आयपीएलचा सर्वात कंजूस गोलंदाज कोण? सर्वाधिक निर्धाव षटकं कोणी टाकली आहेत?