---Advertisement---

श्रीलंकेपाठोपाठ हे क्रिकेट बोर्ड म्हणतं, आयपीएल आमच्या देशात घ्या

On: रविवार, मे 10, 2020 2:57 PM
---Advertisement---

श्रीलंका क्रिकेट बोर्डानंतर आता युएई क्रिकेट बोर्डाने आयपीएलचे आयोजन करण्याचे निमंत्रण दिले आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्याचा प्रस्ताव युएई क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय समोर ठेवला आहे.

यापुर्वी २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीदरमन्यानही युएईमध्ये आयपीएलच्या काही सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

यावर बीसीसीआयने अजून कोणतीही प्रतिक्रीया मात्र दिलेली  नाही.

यापुर्वी २००९मध्ये दक्षिण आफ्रिका तर २०१४मध्ये युएईमध्ये आयपीएलचे सामने झाले होते.

सध्या भारतात कोरोना या वैश्विक महामारीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे सध्यातरी बीसीसीआय खेळाडूंच्या आरोग्यालाच प्राधान्य देऊन आंतरराष्ट्रीय दौरा टाळेल असे वाटते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---