अहमदाबाद। गुरुवारी (१८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या या विजयात सुर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सुर्यकुमारचे अर्धशतक
सुर्यकुमार त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा दुसराच सामना खेळत होता. त्याने याच मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी पकडली. भारताच्या पहिल्या ३ विकेट्स लवकर गेल्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी केली. विशेष म्हणजे त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तसेच पुढे त्याने २८ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. यावेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधून टाळ्यांचा कडकडाट झाला. भारताचा कर्णधार विराट कोहलीही हात उंचावत टाळ्या वाजवून सुर्यकुमारचे कौतुक करताना दिसला. तसेच या सामन्यासाठी ११ जणांच्या संघात समावेश नसलेला दिपक चाहर शिट्टी वाजवतानाही दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CMkF-MmgBtT/
सुर्यकुमारने या सामन्यात ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तो १४ व्या षटकात तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे बाद झाला.
भारताने जिंकला चौथा सामना
चौथ्या टी२० सामन्यात भारताने २० षटकात सुर्यकुमार यादवच्या ५७ धावांच्या आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक ३७ धावांच्या खेळीमुळे ८ बाद १८५ धावा उभारल्या. तसेच इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १७७ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“टीम सिलेक्शनसाठी वय नाही तर, ‘हा’ असावा मुख्य निकष”, सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला सल्ला
झिंगाटच! मराठमोळा ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२१ साठी करतोय जोरदार तयारी, पाहा व्हिडिओ






